Maharashtra Assembly Election 2024: सध्या विधानसभा निवडणुकांचे वेध साऱ्याच पक्षांना लागलेले आहेत. सर्व पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या समोर येत असताना महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार की जागांची अदलाबदल होणार याचा संध्याकाळपर्यंत निर्णय होईल असे सांगत भावनिक होण्याची नक्कल करू नये असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे जिंतूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजय भांबळे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिंतूर येथे आले होते. यावेळी त्यांनी अजितदादांच्या भावनिक होण्यावर त्यांनी टोला लगावला. तसेच महाविकास आघाडीतील मैत्री पूर्ण लढत की जागांची अदलाबदल याबाबतीत आज सायंकाळ पर्यंत निर्णय होणार असल्याचे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे काय परिस्थिती आहे ?
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या 135 पेक्षा जास्त जागा निवडून येण्यासारखी परिस्थिती आहे. पण भाजप पैशाच्या बळावर मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवार तसेच छोट्या पक्षांना निवडणुकीत उभा करून मत विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये देखील स्पर्धा लागलेली आहे.
रासपाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना भाजपने पाठिंबा दिला
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात कोठेतरी महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे त्यामुळेच राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी भाजपकडे पाठिंबा मागितला आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी तो दिला रत्नाकर गुट्टे हे सागर बंगल्यावर गेले असतील आणि त्यांनी विनंती केली असेल पण असे असले तरी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार असे रोहित पवार म्हणाले.पाथरी मतदारसंघातून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली का? यावर विचारले असता रोहित पवार म्हणाले, अशी चर्चा आहे आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल.
भावनिक होण्याची नक्कल करू नये
खरंतर भावनिक व्हायचे किंवा नाही व्हायचे हे आपल्या हातात नसते माणूस आपण होऊन भावनिक होत असतो.एखादा व्यक्ती भावनिक होत असेल तर मला त्याविषयी बोलता येणार नाही पण आपण भावनिक होण्याची नक्कल करू नये.भावनिक व्हायचं आपल्या हातात नसतं ते आतूनच सिद्ध होतं असे रोहित पवार म्हणाले.