नाशिक : एकीकडे राज्यात दिवाळीचा (Diwali 2024) उत्साह पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच नाशिकमध्ये झळकलेल्या एका बॅनरची आता जोरदार चर्चा रंगली आहे. 


महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली आहे. एकीकडे महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रचार करण्यात आला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या योजनेला कडाडून विरोधात करण्यात आला आहे. आता लाडकी बहीण योजनेची टॅगलाईन घेऊन नाशिकमध्ये बॅनर झळकले आहे. 


लाडक्या बहीण बॅनरची जोरदार चर्चा 


महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच दिवाळीचा सण देखील आहे. मात्र, नाशिक शहरात लाडक्या बहिणीचा बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिक शहरातील त्र्यंबक नाका या परिसरात अन्याय टोकाला गेला की गप्प बसायचं नसतं... म्हणूनच येते तुमच्या भेटीला लवकरच तुमची खरी लाडकी बहीण... असा मजकूर या बॅनरवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे बॅनर अज्ञातांकडून लावण्यात आले आहे. या बॅनरची शहरभर जोरदार चर्चा रंगली आहे. बॅनरवरील मजकूर निवडणुकीच्या प्रचाराचा भाग की, भाऊबीजच्या शुभेच्छांचा याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Sanjay Raut : मविआत दोस्तीत कुस्ती होणार? 7 ते 8 जागांवरील मैत्रीपूर्ण लढतीवर राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले, उद्या दुपारपर्यंत...


Ajit Pawar: 'लोकसभेला साहेबांना खुश केलं आता मला करा', अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन, नेमकं काय म्हणालेत?