Mahadev Munde Death Case: परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्याकांडाला (Mahadev Munde Death Case) तब्बल 21 महिने उलटले तरीही आजवर दोषींना अटक झालेली नाही. त्यामुळे अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज (31 जुलै) ज्ञानेश्वरी मुंडे आपल्या कुटुंबियांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. देवेंद्र फडणवीसांची मुंबईत भेट घेण्याआधी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी एबीपी माझाशी संवाद साधत पुन्हा धक्कादायक आरोप केले आहेत. 

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुपारी दोन वाजताची वेळ मला दिली आहे. जे काही या प्रकरणांमध्ये घडलं हे सगळं मी मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडेंनी सांगितलं. मागील अनेक दिवसांपासून मी मुख्यमंत्र्यांची वेळ या सगळ्या प्रकरणासंदर्भात मागत होते. मागील 21 महिन्यापासून मी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, असं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या. महादेव मुंडे यांची ज्यांनी हत्या केली ती आरोपी अजूनही मोकाट आहेत. आता जी नाव आरोपींची आहेत ती नाव मी गुप्तपणे मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. बंगल्यावरून फोन येतो आणि पुढे काहीच होत नाही आणि तो बंगला धनंजय मुंडेंचा आहे, असा खळबळजनक आरोपही ज्ञानेश्वरी मुंडेंनी केला आहे. तसेच मला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये एसआयटी आणि सीआयडी मार्फत तपास व्हावा, अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली. 

महादेव मुंडेंच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नेमकं काय?

बीडमधील महादेव मुंडे खून प्रकरणात धक्कादायक खुलासे करणारे विजयसिंह बाळ बांगर यांनी आता या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल देखील समोर आणला आहे. बांगर यांनी मुंडे कुटुंबीयांना भेट देत मी तुमच्या न्यायाच्या लढ्यात सोबत असल्याचे सांगितले होते. आता या शवविच्छेदन अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 21ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांचा खून झाला आणि 22 ऑक्टोबर रोजी रात्री 12.15 ते 1.30 असे सव्वा तास उपजिल्हा  रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते. आधी महादेव मुंडे यांचा गळा कापण्यात आला. त्यांच्या शरीरावर तब्बल 20 से.मी. लांब, 8 से.मी. आणि 3 से.मीरुंद असा हा वार होता. तर त्याच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार करण्यात आले होते. मानेवरचा वार चुकविल्याने तोंडावर वार झाला होता. तोंडापासून कानापर्यंत एक वार झाला त्याची लांबी 13 से.मी. इतकी होती तर रुंदी व खोली दीड सेंटीमीटर होती. महादेव मुंडे यांच्या अंगावर 16 वार असल्याचे या शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. महादेव मुंडे यांच्या गळ्यावर समोरून वार केल्याने त्यांची श्वसननलिका कापली गेली होती. तसेच काही रक्तवाहिनाही तुटल्या होत्या. दरम्यान महादेव मुंडे यांनी दोन्ही हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या डाव्या आणि उजव्या हातावर अंगठ्याजवळ ,तळहातावर आणि मधल्या बोटावर जखमा झाल्या होत्या. खाली पडल्यानंतर डाव्या गुडघ्यालाही खरचटल्याची नोंद आहे. त्यांचा चेहरा छाती आणि हात रक्ताने माखलेले होते. त्यांच्या अंगावर रक्ताने माखलेली पांढरी बनियन आणि ब्राऊन कलरचा शर्ट होता. डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल परळी शहर पोलिसांना दिला होता. त्यात अतिरक्तस्राव झाल्याने शॉकमध्ये जाऊन महादेव मुंडे यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.

संबंधित बातमी:

Bala Banger On Walmik Karad: धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती; बाळा बांगर यांचा धक्कादायक आरोप