Bala Banger On Walmik Karad: बीडच्या परळमधील महादेव मुंडे खून प्रकरणाचा (Mahadev Munde) तपास एसआयटी आणि सीआयडीमार्फत करण्यात यावा, यासाठी आज परळी-अंबाजोगाई महामार्गावर कन्हेरवाडी आणि भोपळा ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले. महादेव मुंडे कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी होत असलेल्या या रास्ता रोको आंदोलनात धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) देखील सहभागी झाले.
महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी परळी अंबाजोगाई महामार्गावर ग्रामस्थांनी मुंडे कुटुंबीयांचा रास्ता रोको सुरू आहे. याच रास्ता रोको आंदोलनासाठी आता मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील पोहचले आहेत. याचबरोबर याप्रकरणात अनेक धक्कादायक दावे असे करणारे आणि संतोष देशमुख प्रकरणातील (Santosh Deshmukh Death Case) आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याचे जुने सहकारी बाळा बांगर (Bala Banger) धनंजय देशमुखसह या आंदोलनासाठी दाखल झाले. यावेळी बाळा बांगर यांनी वाल्मिक कराडबाबत काही धक्कादायक आरोप केले आहेत.
बाळा बांगर नेमकं काय म्हणाले?
सदर प्रकरणात बोलू नको असे म्हणत माझ्यावर दबाव येत होता. मात्र त्यांना माहित नव्हतं की, मी या प्रकरणातील जबाब दिला. मी घाबरणार नाही, माघारही घेणार नाही. परळीला वाल्मिक कराडने कीड लावली. मीच फरार होतो तर मी म्हणून या प्रकरणात म्हणून मला बोलायला उशीर लागला. प्रशासनाने वाल्मिक कराड आणि टोळीला अभय दिले. आता वाल्मिक कराड कधी बाहेर येणार नाही, असं बाळा बांगर म्हणाले. काल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती माझ्या पत्नीने सांगितले की, ती रेकॉर्डिंग मी व्हायरल केली नाही. आता या रेकॉर्डिंग प्रकरणाची सीडीआर काढावेत म्हणून मी पण उपोषणाला बसणार आहे. वाल्मिक कराडच्या टोळीमध्ये काही महिलाही सक्रिय होत्या. माझ्याकडे वाल्मिक कराडचे सगळे पुरावे आहेत. पुढच्या महिन्यात मी पत्रकार परिषद घेणार आहे. मुंडे हत्या प्रकरणातील कराड टोळी जेरबंद झाली पाहिजे, असं बाळा बांगर यांनी सांगितले.
धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराड पोटनिवडणूक घ्यायची होती- बाळा बांगर
माझा परळी पोलिसांवरचा विश्वास थोडा कमी आहे. वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या वाईटावर होता. धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराड याला पोटनिवडणूक घ्यायची होती, असा धक्कादायक दावाही बाळा बांगर यांनी केला. धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी यांना मारण्याचा कट देखील वाल्मिक कराड यांनी रचला होता. माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांना देखील त्रास दिला. त्यामुळे ठोस आश्वासन मीळेपर्यंत मागे सरकायचं नाही, असं बाळा बांगर म्हणाले.