Sunil Tatkare Press Conference : रासपला महायुतीकडून लोकसभेची एक जागा दिली जाणार आहे. महादेव जानकर (Mahadev Jankar) महायुतीसोबत राहणार आहेत, असं त्यांनी आमच्याकडे स्पष्ट केलं आहे. रासपचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) आजच्या बैठकीला उपस्थित होते. आम्ही सविस्तरपणे विविध विषयांवर चर्चा केली. महायुतीकडून लोकसभेची एक जागा जानकर यांना दिली जाणार आहे, असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले. सुनील तटकरे यांनी महायुतीची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. महायुतीच्या बैठकीला रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) उपस्थित होते. 


महादेव जानकर महायुतीला बळकट करतील


सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, आम्ही जागा वाटपाबाबत जाहीर करु तेव्हाच त्यांना कोणती जागा दिली जाणार हे स्पष्ट करु. महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या निर्णयामुळे महायुती बळकट होण्यामध्ये आम्हाला सहकार्य होईल, असा विश्वास आहे. राज्याभरात आम्ही 45 प्लसचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग आणि मोठ्या प्रमाणात योगदान राहिल, असा विश्वास मी तिन्ही पक्षांच्या वतीने व्यक्त करतो. शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल सर्वांचा सन्मान होईल, असा निर्णय होईल. रासपबाबत आम्ही सर्वांनी विचार करुन निर्णय घेतला आहे. एनडीएसाठी जानकर यांच्याकडून चांगली साथ मिळेल. 


आमची जागा वाटपाबाबतची चर्चा 90 टक्के संपलेली आहे


आम्ही एकत्रित बसून कोणती जागा त्यांनी लढवावी, याबाबतचा निर्णय घेऊ. आमची जागा वाटपाबाबतची चर्चा 90 टक्के संपलेली आहे. महाराष्ट्रातील निवडणुका पाच टप्प्यांत होणार आहेत. त्यामुळे अतिशय समन्वयाने आम्ही भूमिका घेत आहोत. मित्र पक्षांना सन्मानपूर्वक स्थान देण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. मनसेला किती जागा सोडायच्या याबाबत याबाबत देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होईल, असंही सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्पष्ट केलं.रासपमुळे महायुतीला सर्व 48 मतदारसंघात फटका बसणार, असा इशारा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी महायुतीला दिला. शिवाय शरद पवार यांनी डाव टाकत महादेव जानकर यांना माढ्यातून उमेदवारीची ऑफर दिली होती. त्यानंतर महायुतीने महादेव जानकर यांना 1 जागा देऊन, आपल्याकडे खेचून घेतले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Vijay Shivtare : 12 तारखेला 12 वाजता फॉर्म भरून बारा वाजवणार! बारामतीसाठी शिवतारे ठाम, अजितदादांना घाम!