मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मेळाव्या जोरदार भाषण केले. आगामी विधानसभेची निवडणूक एकजुटीन लढवण्याचा निर्धार त्यांनी केला. विशेष म्हणजे निवडणुकीच्या अगोदरच महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवावा. कोणत्याही नेत्याची या पदासाठी निवड करावी, मी तयार आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केले. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा उल्लेख करून त्यांनी हे आवाहन केले. 


उद्धव ठाकरे काय म्हणाले? 


भाजपाच्या युतीत असताना आम्ही जो अनुभव घेतला, त्या अनुभवाची पुनरावृत्ती आम्हाला नको. आम्ही 30 शिवसेना आणि भाजपाच्या युतीत होतो. आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री, असं जाहीर केलं जायचं. एकमेकांच्या पायावर धोडे टाकण्यासाठी आम्ही हेच धोरण वापरायचो. तुझ्या जागा जास्त आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, म्हणून तुझी जागा मी पाडायचो आणि माझी जागा तू पाडायची असं व्हायचं.  त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात युतीला काहीही महत्त्व राहिलं नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली. 


निवडणूक 1 महिना पुढे ढकलण्यावर विचार सुरू


राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्याला 10 हजार रुपयांचा महिना दिला जातोय. त्यासाठी कामासाठी त्यांनी योजनादूत नेमले आहेत. हा लोकांचा पैसा आहे. अशा योजनांमध्ये राज्याची लूट होत आहे. अडीच वर्ष काय काम केलं ते लोकांपर्यत पोहचवा. होऊन जाऊ दे चर्चा. तुम्ही काय केलं आम्ही काय केलं? यावर चर्चा करू. विधानसभा निवडणूक 1 महिना पुढे ढकलण्यावर विचार सुरू आहे.  लाडकी बहीण योजना आणली, पण पैसा कुठे? IAS अधिकारी मला सांगतायंत साहेब तुम्ही लवकर या. यांचं खरं गद्दारांचं रुप आहे. सरकार पडायला 50 खोके आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले जात आहेत


पाहा उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण



मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा आणि पुढे चाला


तसेच, यावेळी ज्याच्या जागा जास्त होतील त्याचा मुख्यमंत्री हे धोरण राबवण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा आणि पुढे चला. त्यासाठी माझी काहीही हरकत नाही. महाविकास आघाडीची पहिल्यांदाच संयुक्त मेळावा होत आहे म्हणून यजमानपद स्वीकारुया असा मी विचार केला. या मेळाव्यात ओपनिंग बॅट्समॅनची भूमिका बजावुया असं मी ठरवलं. ओपनिंग बॅट्समनचं कसं असतं, चांगला स्कोअर केला तर केला नाहीतर बाकीचे प्लेअर खेळणारे आहेतच, त्यांची बॅटिंग बघू, असा माझा विचार होता, असे उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.


आग लावण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा बिल आणलं


मुस्लिम समाजाने आपल्याला भरभरून मतदान केलं. कोरोनामध्ये मी या समजसाठी काम केलं. एनआरसी, सीसीए आंदोलनावेळी आम्ही मुस्लिमासोबत होतो.  मोदी यांनी आग लावण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा बिल आणलं आहे. हे विधेयक बहुमत असताना मंजूर का केलं नाही. 
शिवसेनेचे खासदार त्यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते, कारण मी दिल्लीत होतो. 


....तर त्याला आम्ही विरोध करू


वक्फ बोर्ड असो किंवा हिंदू संस्थांनाच्या जागा असतील तिथे वेडवाकडं होऊ देणार नाही. वक्फ बोर्ड विधेयकाखाली तुम्ही जर त्या जमिनी तुमच्या लाडक्या उद्योगपतींना देणार असाल, तर त्याला आम्ही विरोध करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.


मराठा आरक्षण विधेयकाला आम्ही पाठिंबा देऊ


आजच निवडणूक जाहीर करा. तुम्ही राज्यात ओबीसी मराठा वाद लावलाय. मराठा आरक्षण बिल लोकसभेत आणा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. मुंबईतसुद्धा अनेक अडचणी आहेत.  मोदी-शाह हे मुंबईखडे सोन्याचं अंडं देणारी कोबंडी म्हणून पाहात आहेत. या कोंबडीला आपल्याला कापू द्यायचे नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


...पण जागा वाटपात भांडण करू नये


जागावाटपवरून भांडण करू नका, कामात वज्रमूठ कामात दिसली पाहिजे.  त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतली आहे. काँग्रेसचा हात, सेनेची मशाल, आणि पवार साहेबाचा हातात तुतारी असलेला मावळा गावागावात पोहोचवा. मी पुन्हा एकदा सांगतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा पण जागा वाटपात भांडण करू नये, अशी आशाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.


हेही वाचा :


अजित पवार घरातच लढणार, लोकसभेला पिळून काढल्यानंतर त्यांना बारामतीत रस राहिला नाही; राऊतांचा हल्लाबोल


Sharad Pawar : लोकसभेचे मैदान मारल्यानंतर शरद पवार प्रथमच वर्ध्याच्या दौऱ्यावर; विदर्भातील राजकीय मंथन होण्याचीही शक्यता


नारायण राणेंच्या खासदारकीला आव्हान, हायकोर्टाने राणेंना समन्स बजावलं!