Madha Loksabha : भाजपने माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, निंबाळकरांना उमेदवारी जाहीर होताच महायुतीतील अनेक नेते त्यांच्याविरोधात मैदानात उतरले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुतीतील धुसफूस संपण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. माढा मतदारसंघातील नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांनी सागर बंगल्यावर बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite-Patil), समाधान अवताडे (Samadhan Autade), सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) अशी सोलापुरातील नेते मंडळी रवाना झाली आहे.
महायुतीमध्ये वाद विकोपाला जाऊ नये, फडणवीसांचे डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न
माढ्याच्या उमेदवार जाहीर झाल्यापासून महायुतीतल नाराजीनाट्य अजूनही सुरुच आहे. मोहिते पाटील - रामराजे निंबाळकर विरूद्ध विद्यमान खासदार वाद सुरू असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोखेदुखी वाढलीये. त्यामुळे माढ्याचा राडा सोडवण्यासाठी फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे फडणवीसांनी माढा लोकसभेतील आमदार समाधान अवताडे, विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सुभाष देशमुख यांना सागर बंगल्यावर बोलावलं आहे.
नाईक निंबाळकरांना भाजपकडून दुसऱ्यांदा उमेदवारी
माढाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी दिली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निंबाळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा दारुण पराभव केला होता. मात्र, तेव्हा माढा मतदारसंघात महाविकास आघाडीतील पक्षांबाबत प्रचंड नाराजी होती. मात्र, 2019 मध्ये खासदार म्हणून निवडून आल्यानंतर निंबाळकर यांचा जनसंपर्क काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे भाजपमधील काही नेतेही निंबाळकर यांच्यावर नाराज झाले आहेत.
मोहिते-पाटील बंडाच्या तयारीत
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील आणि सर्व कुटुंबीय निवडणुकीपासून दूर राहिले. रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने विधानपरिषदेवर पाठवले. दरम्यानच्या काळात मोहिते पाटील कुटुंबीय भाजपमध्येच आहे, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, आमचं तुतारी हातात घ्यायचं ठरलय. फक्त शरद पवार यांच्याकडून निरोप यायला हवा. त्यांची मान्यता नसताना विधान करणे, योग्य नाही, असं वक्तव्य जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले. त्यामुळे मोहिते पाटील गट आता भाजपविरोधात शड्डू ठोकणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या