मुंबई : रविंद्र वायकर (Ravindra Waikar)  यांना उत्तर पश्चिममधून शिवसेनेकडून अखेर  उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वायकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची काल रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली होती.  यावेळी या दोघांमध्ये बराच काळ चर्चा सुरु होती. या बैठकीअंती वायव्य मुंबईतून(Mumbai North west)  रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे.या बैठकीनंतरच रवींद्र वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.  आता ईडीची चौकशी सुरू असणाऱ्या रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर लढत होणार आहे.  


रवींद्र वायकर हे सोमवारी रात्री उशीरापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरी होते. ते एकटेच एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते. यावेळी या दोघांमध्ये बराच काळ चर्चा सुरु होती. या बैठकीअंती वायव्य मुंबईतून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले. रवींद्र वायकर हे रात्री अडीचच्या सुमारास एकनाथ शिंदे यांच्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना वायव्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


वायकर म्हणजे काम हा ब्रँड : वायकर 


रविंद्र वायकर म्हणाले, नवीन उमेदवाराला प्रचाराला वेळ द्यावा लागतो. मी मुंबई महानगरपालिकेत चार वेळा नगरसेवक होतो.आरोग्य, शिक्षण अशी  मी जनतेची अनेक काम केले आहे. वायकर म्हणजे काम हा ब्रँड झालाय. चार वेळा नगरसेवक तीन वेळा आमदार अशी 35 वर्षे मी जनतेची अविरत सेवा करत आहे. माझा प्रचार 35 वर्षे झाला आहे.


भाजपची पूर्ण साथ मिळणार : रविंद्र वायकर


1974 पासून बाळासाहेब ठाकरेंसोबत काम करत आहे. राजकारणात बदल कधीही होते. कोण कोणाचे मित्र आणि कोण कोणाचे शत्रू असेल काही सांगता येत नाही.  दिल्ली हे माझे स्वप्न नव्हते. महाराष्ट्र हे माझे स्वप्न होते. जे घडेल ते विधीलिखीत असणार आहे.युद्धात जिंकण्याच्या उद्देशाने उतरतो. मी कधीच अपयश पाहिले नाही. महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणार आहे. काम करणारा प्रतिनिधी आहे. भाजपची पूर्ण साथ मिळणार आहे.


 अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर लढणार? (Amol Kirtikar Vs Ravindra Waikar)


गजानन कीर्तिकर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. अमोल कीर्तिकर यांना ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. आता एकेकाळी उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेल्या रवींद्र वायकर यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. 


हे ही वाचा :


एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या खास मोहऱ्यालाच रिंगणात उतरवलं, उत्तर-पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना उमेदवारी