जालना : ओबीसीने (OBC Reservation) कधी महाराष्ट्रात दंगली घडवल्या आहेत का? उठाव केला आहे का? असा कोणता इतिहास आहे का? असा सवाल लक्ष्मण हाकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंना (Manoj Jarange) केला आहे. शरद पवारांनी आरक्षणासाठी सर्व पक्षीय नेत्यांची, आमदार, खासदार, सामाजिक शास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ, विद्यापीठाच्या कुलगुरूंची बैठक बोलवावी. तसेच एका खुळखुळा वाजवणाऱ्या माणसामुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणांना रोखले पाहिजे समजून सांगितलं पाहिजे असे आवाहन देखील लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांना केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
लक्ष्मण हाके म्हणाले, शरद पवार पुरोगामी होते, उदारमतवादी होते. ते व्यक्त होत नाहीत याची खंत आहेत. ते प्रभावी व्यक्तिमत्व आहे. शरद पवार साहेबांनी एका खुळखुळा वाजवणाऱ्या माणसामुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणांना रोखले पाहिजे समजून सांगितलं पाहिजे. शरद पवार साहेबांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी,आमदार खासदारांची बैठक बोलवावी. सामाजिक शास्त्रज्ञ, इतिहासतज्ज्ञांची बैठक बोलवावी. प्रत्येक विद्यापीठाच्या कुलगुरूंची बैठक बोलवावी सर्वांना एकत्रित बसवावे, त्यांचा सर्व लोक आदर करतील, त्यांनी ही भूमिका घेतली तर मुख्यमंत्री येथील विरोधी पक्ष नेते येथील वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख येतील विधानसभा लोकप्रतिनिधी येतील.
ओबीसीने या महाराष्ट्रात कधी दंगल केली आहे का? हाकेंचा सवाल
ओबीसीने या महाराष्ट्रात कधी दंगल केली आहे का? उठाव केला आहे का? अशी कोणता इतिहास आहे का? ओबीसी वंचित शोषित आहे. मराठा समाज शासनकर्ती जमात आहे, असे देखील लक्ष्मण हाके म्हणाले
झुंडशाहीच्या बळावर आरक्षणाची मागणी करणं घटनाविरोधी : लक्ष्मण हाके
झुंडशाहीच्या बळावर आरक्षणाची मागणी करणं घटनाविरोधी आहे. जरांगेसाहेब अलीकडे वक्तव्य पाहता ते काही बोलतील. एखाद्या कार्यक्रमात शेरोशायरी केली जाते त्याचा अर्थ मतीत अर्थ घ्यायचा असतो शब्दार्थ घ्यायचा नसतो. तो फक्त प्रेरणा देण्यासाठी असतो. भुजबळांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. महाराष्ट्रात लगेच दंगली होणार नाही. कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात आहे. शासन, प्रशासन काम करेल. उगाच शब्दश: अर्थ घ्यायचा आणि काही वक्तव्य करणे खूप खालची पातळीचे राजकारण आहे, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
आमदार खासदारांचे कौन्सिलिंग होणं आवश्यक : लक्ष्मण हाके
सर्वात मोठे शिक्षणात गळतीचे प्रमाण भटक्या विमुक्तांच आहे. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांचे विक्रमी गर्भाशय काढले जातात, त्यांना मासिक पाळीत आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत, हे माझ्या फुले शाहू च्या महाराष्ट्राला शोभते का? मराठा आणि कुणबी एकच आहे असे म्हणणे सामाजिक मूर्खपणा असे जस्टीस मारलापल्ले यांनी म्हटलं होतं. गावबंदी करु नये सर्वांना विनंती. आपण आंबेडकरांच्या संविधनावर चालणारे आहे. आमदार खासदारांचे कौन्सिलिंग होणं आवश्यक आहे. त्यांना संविधान माहिती नाही विधानसभेच्या लोकांची शाळा घेतली पाहिजे, असे देखील लक्ष्मण हाके म्हणाले.
हे ही वाचा :
Manoj Jarange: मराठा नेत्यांनी शहाणे होऊन आरोप बंद करावेत, तुमच्यामुळे एक दिवशी जात मरेल; जरांगे पाटलांचा सल्ला