Lakshman Hake On Manoj Jarange: प्रत्येक आंदोलनात जरांगे वेगळी मागणी करत असून जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जीआर काढतो याची लाज वाटते असं म्हणत जरांगे तमाशातला सोंगाड्या आहे. जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या, यापेक्षा जरांगेंची लायकी नाही, असा टोला ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके (Lakshman Hake) यांनी लगावलाय. जालन्यातून ते बोलत होते.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उफाळून आला असून मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन सुरु असतानाच ओबीसीही आक्रमक भूमिका घेताना दिसतायत. दरम्यान, मराठा आरक्षणाची भूमिका समजून घेण्यासाठी अंतरवली सराटीला गेलेल्या नेत्यांनाही लक्ष्मण हाकेंनी चांगलंच सुनावलंय. हैदराबाद गॅझेट ,सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅजेट लागू करण्याची शासनाची हालचाल सुरू आहे हा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी दिला मुख्यमंत्र्याला कायदा कळतो का? असा सवालही त्यांनी केलाय.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून जीआर काढणार असाल तर ओबीसींचे जशास तसे उत्तर देणार असा इशारा ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाकेंनी दिलाय. ते म्हणाले, ''या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जीआर काढतो लाज वाटते. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण या माणसांना अंतरवली सर्टिला जायला वेळ आहे आणि ओबीसीच्या एकही आंदोलकाकडे जायला यांच्याकडे वेळ नाही. राहुल गांधी तुम्ही ओबीसी ची भाषा बोलतात ,पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस आंतरवाली सराटीला जाऊन आला , त्याने ओबीसी ची भावना ऐकून घ्याव्यात,'' असंही ते म्हणाले.
'जरांगेचा बाप आला, शरद पवार जरी आला..'
जरांगेच काय जरांगेचा बाप जरी आला शरद पवार जरी आला तरी ओबीसीच्या आरक्षण संपू शकत नाही. असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना चांगलच घेरल्याचं दिसून आलं. तुझ्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह टाक आणि बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर असं हाके म्हणाले.
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या'
प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी करत आहेत. ९६ कुळ्यांची भाषा करायची आणि आम्ही मागास असल्याचं म्हणायचं. असं म्हणत जरांगेंना तुमच्या बिगबॉस मध्ये घ्या अशी माझी बिग बॉसच्या लोकांना मागणी आहे. यापेक्षा जरांगेंची कुठेही लायकी नाही असे ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके म्हणाले. जरांगेच्या बॅनरवर फुले शाहू आंबेडकरांचा फोटो लागलेला दिसतो का?? असा सवालही त्यांनी केला. जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री जीआर काढतात याची लाज वाटते. हैदराबाद गॅझेट ,सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅजेट लागू करण्याची शासनाची हालचाल सुरू आहे हा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी दिला मुख्यमंत्र्याला कायदा कळतो का? असा सवालही त्यांनी केला.
हेही वाचा:
मोठी बातमी: उपोषण सुरु असताना मनोज जरांगेंचा भाऊ अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला