Jalna: राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच तापला आहे. सोमवारी मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी संभाजीराजे छत्रपती गेल्याने दिवसभर अंतरवली सराटी आणि वडीगोद्री गावात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडल्या. दरम्यान, आज ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या भूमिकेवर महत्त्वाचं वक्तव्य केलंय. धनगरांना एसटी आरक्षण जाहीर करा मग आम्ही ओबीसीचा आरक्षण ठरवू असं म्हणत आहे का शरद पवार आणि जरांगेमध्ये हिम्मत? असा सवाल हाकेंनी केला. उद्यापासून ओबीसी आरक्षणाची भूमिका ठरवू असंही हाके म्हणालेत.
ओबीसी आंदोलनात फूट पाडू नका. आजपर्यंत भुजबळ साहेबांना टार्गेट केलं. आता धनगरांना टार्गेट करण्याच्या भानगडीत पडू नका. ते तुम्हाला सोसणार नाही, असा इशारा हाकेंनी दिला.
ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सांगा
आम्हाला शासनाने आश्वासन द्यावं. 54 लाख नोंदी केल्यास म्हणता आणि ओबीसीला धक्का लागत नाही असेही म्हणता. ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सांगावं. आधी धनगरांना एसटी आरक्षण डिक्लेअर करा. मग आम्ही ओबीसीचा आरक्षण ठरवू. असं लक्ष्मण हाके म्हणाले. एसडीएम तहसीलदार सोडले तर शासनाचा एकही अधिकारी इकडे फिरकलेला नाही. तुम्ही राजधर्म विसरला तर तुम्हाला सळो की पळो करतील असं ओबीसी नेत्यांना ते म्हणाले.
आम्ही फक्त नाव घेतलं म्हणून एवढं झोंबतय का?
विक्री भाषा म्हणजे काय. मिस्टर संभाजी भोसले एवढेच बोलले. आणि तुम्ही आम्ही ओबीसी आहोत. आम्ही फक्त नाव घेतलं म्हणून तुम्हाला झोंबतय, दलित ओबीसींच्या लोकांना काहीच इज्जत आणि स्वाभिमान नसतो का असा सवाल हाके यांनी संभाजीराजे छत्रपतींना केला.
राजरत्न आंबेडकर शरद पवारांचा एजंट आहे का?
मी राजरत्न आंबेडकर यांना ओळखत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो. रामदास आठवले जोगेंद्र कवाडे यांना ओळखतो. आंबेडकर तुम्हाला आमदार खासदार व्हायचं असेल, इथल्या ओबीसींच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी नाव बदलावं, असं हाके म्हणाले. राजरत्न आंबेडकर शरद पवारांचा एजंट आहे का? असा सवाल करत काम करून आमदार होणार असेल ठीक. नको त्या गोष्टी फॉलो करून आमदार होता येत नाही. असंही त्यांनी सुनावलं.