Kunal Patil : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सोमवारी काँग्रेस (Congress) सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर त्यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण यांच्या भूमिकेवर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांनीही अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
कुणाल पाटील म्हणाले की, मी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सोडणार नाही. मी काँग्रेस सोडणार याची चर्चा कुठून सुरू झाली हे माहिती नाही. अशोक चव्हाण साहेबांनी काँग्रेस सोडल्याने पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. पण काँग्रेसचा विचार आम्ही समर्थपणे पुढे घेऊन जाऊ, असे त्यांनी म्हटले आहे.
भविष्यात काँग्रेसला खूप मोठं यश मिळणार : कुणाल पाटील
काँग्रेसने असे अनेक धक्के पाहिले आहेत. पण काँग्रेस संपली नाही. भविष्यात काँग्रेसला खूप मोठं यश मिळणार यात काही शंका नाही. वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने उद्या मुंबईच्या बैठकीला जाणार नाही, वेगळा अर्थ काढू नये, असेदेखील आमदार कुणाल पाटील यांनी म्हटले आहे.
आमदार हिरामण खोसकरांचा खुलासा
राज्य शासनाच्या वतीने 5 फेब्रुवारीपासून काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर अभ्यास दौऱ्यासाठी केनिया देशात गेले आहेत. त्यामुळे त्यांचा फोन नॉट रीचेबल आहे. आमदार खोसकर यांच्या पक्षांतराबाबत विविध बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत आहेत. मात्र यात काहीच तथ्य नाही असा खुलासा हिरामण खोसकर यांच्या कार्यालयाद्वारे करण्यात आला आहे. 15 फेब्रुवारीला अभ्यास दौरा पूर्ण झाल्यानंतर हिरामण खोसकर भारतात परततील. यानंतर भूमिका करणार, अशी माहिती खोसकर यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी?
अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कारण, अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी 15 फेब्रुवारीला होणार होता. मात्र अचानक त्यांचा आजच पक्ष प्रवेश होणार आहे. राज्यसभेसाठी नामंकन देण्याची अखेरची तारीख एका दिवसावर आले असल्याने अशोक चव्हाण राज्यसभेवर जाणार अशा चर्चांना उधाण आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या