Karjat Jamkhed Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी (BJP candidate First List) जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 99 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. यामध्ये भापजनं कर्जत-जामखेडमधून (Karjat Jamkhed ) पुन्हा राम शिंदे (Ram Shinde) यांनी संधी दिली आहे. त्यामुळं कर्जत जामखेडमध्ये पुन्हा रोहित पवार (Rohit Pawar) विरुद्ध राम शिंदे असाच सामना रंगणार आहे. तिथं मैदान तेच, उमेदवारही तेच अशीच लढत होणार आहे. त्यामुळं यावेळी कोण बाजी मारणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. 


विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यासाठी भाजपने इतर पक्षांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. भाजपने आज 99 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये कर्जत जामखेडमध्ये पुन्हा राम शिंदेंना संधी देण्यात आली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे आव्हान असणार आहे. रोहित पवार यांची या मतदारंसघातून जवळपास उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळं पुन्हा या दोघांमध्येच विधानसभेचा सामना रंगणार आहे. 


2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?


2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजपाचे तत्कालीनं मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता. रोहीत पवार यांनी तब्बल 43,347 मतांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. 25 वर्षापासून सत्ता असलेल्या कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये रोहीत पवार यांनी भाजपचा दारुण पराभव केला होता. रोहित पवार यांना 1 लाख 35 हजार 824 मतं मिळाली आहेत. तर राम शिंदे यांना 92 हजार 477 मतं मिळाली आहेत. रोहित पवारांच्या दणदणीत विजयानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठा जल्लोष करण्यात आला होता. विशेष म्हणजे विजयानंतर रोहित पवार यांनी चक्क राम शिंदे यांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या आईंचे आशिर्वाद घेतले होते. विजयानंतर रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यावेळी राम शिंदे यांनी रोहित पवार यांचे अभिनंदन करत फेटा बांधून सत्कार केला. निवडणूक पार पडली असून मतदार संघातील विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचे, अशी विनंती रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना केली होती.


भाजपाने एकूण 99 जागांवर केली उमेदवारांच्या नावाची घोषणा


भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. सोबतच या यादीत काही खास नावं आहेत. भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांनादेखील भाजपाने संधी दिली आहे. श्रीजया या भोकर या मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भाजपाने तिकीट दिले आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.


महत्वाच्या बातम्या:


BJP First candidate list For Maharashtra Vidhansabha : मोठी बातमी : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, पहिल्या यादीत 99 नावं, फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट