Konkan Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा निकाल (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) समोर आला आहे. आता राज्यातील विविध विजयी नगसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या विजयी उमेदवारांची नावे समोर आली आहे. याचदरम्यान राज्याचं लक्ष लागलेल्या कोकणमधील नगरपरिषदेचा निकालही समोर आला आहे.
मालवणमध्ये शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी स्ट्रिंग ऑपरेशन करत भाजपा पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्याच्या गाडीत पैसे पकडले त्यावेळी देखील पोलिसांना मालवण पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई करण्यास भाग पाडलं. भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोट असल्याचा आरोप करत कोर्टात धाव घेतली. त्यामुळे शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांची मालवणमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली होती. तसेच भाजपाचे आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यात वादही पाहायला मिळाला. त्याच मालवण नगरपरिषदेत नितेश राणेंना (Nitesh Rane) निलेश राणे वरचढ चढल्याचे दिसले. (Konkan Nagarparishad Election Result 2025)
मालवण नगरपरिषदेचा निकाल- (Malvan Nagarparishad)
मालवण नगरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेची मुसंडी मारली आहे. शिवसेना शिंदे गट 10 जागांवर विजयी, तर भाजपाला फक्त 5 जागांवर विजय मिळवला. शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली. तर भाजपाकडून नितेश राणेंनी सर्व सूत्रे हाती घेतले होते. त्यामुळे नितेश राणेंना मालवणमध्ये मोठा धक्का बसला आहे.
मालवण नगरपरिषदेतील विजयी उमेदवारांची यादी-
1. मंदार केणी (भाजप) 2. दर्शना कासावकर (भाजप) 3. दीपक पाटकर (शिवसेना) 4. ललित चव्हाण (भाजप) 5. अनिता गिरकर (शिवसेना उबाठा) 6. सिद्धार्थ जाधव (शिवसेना) 7. पूनम चव्हाण (शिवसेना) 8. निना मुंबरकर (शिवसेना)9. महानंदा खानोलकर (भाजप) 10. अहेंद्र म्हाडगुत (शिवसेना उबाठा)11. शर्वरी पाटकर (शिवसेना) 12. मंदार ओरसकर (शिवसेना उबाठा)13. तपस्वी मयेकर (शिवसेना उबाठा)
सावंतवाडी नगरपरिषदेचा निकाल- (Sawantwadi Nagarparishad)
सावंतवाडी नगरपरिषद आणि वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपाचा 11, शिवसेना शिंदे गटाला 7, काँग्रेसला 1 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी झाला. सावंतवाडीमधून नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपाच्या श्रद्धा राजे भोसले 900 मतांनी विजयी झाल्या.
सावंतवाडी नगरपरिषदेतील विजयी उमेदवारांची यादी-
1. दिपाली भालेकर, भाजप2. तौकीर शेख, काँग्रेस3. सुधीर आडीवरेकर, भाजप4. दुलारी रांगणेकर, भाजप5. आनंद नेवगी, भाजप6. सायली दुभाषी, शिंदे सेना7. देवेंद्र टेमकर, उबाठा8. सुनिता पेडणेकर, भाजप9. खेमराज कुडतरकर, शिंदे सेना10. मोहिनी मडगावकर, भाजप
वेंगुर्ले नगरपरिषदेचा निकाल- (Vengurla Nagarparishad)
वेंगुर्ले नगरपरिषदेत भाजपाचे 16, शिवसेना ठाकरे गटाचे 3 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 उमेदवार विजयी झाला. वेंगुर्ले नगरपरिषदेतील नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपाचे राजन गिरफ 430 मतांनी विजयी झाले.
वेंगुर्ले नगरपरिषदेतील विजयी उमेदवारांची यादी-
1. लीना समीर म्हापणकर, शिंदे सेना2. रवींद्र रमाकांत शिरसाट, भाजप3. गौरी माईनकर, भाजप4. प्रीतम सावंत, भाजप5. विनायक गवंडकर, भाजप6. गौरी मराठे, भाजप7. आकांक्षा परब, भाजप8. तातोबा पालयेकर, भाजप
कणकवली नगरपरिषदेचा निकाल- (Kankavali Nagarparishad)
कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपा विरोध सर्वपक्षीय एकत्र येत नितेश राणेंना घेण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी शहर विकास आघाडीची स्थापना झाली. त्यात आमदार निलेश राणेंनी प्रतिनिधित्व केलं त्यामुळे राणे विरुद्ध राणे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. या कणकवलीच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाला 9 तर शहर विकास आघाडीला 8 जागा मिळाल्या. महत्वाचे म्हणजे भाजपाचे 9 उमेदवार विजयी झाले असले तरी कणकवली नगपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर 145 मतांनी विजयी झाले.
कणकवली नगरपरिषद- (Kankavali Nagarparishad)
भाजपा- 9शहर विकास आघाडी- 8
चिपळूण नगरपरिषदेचा निकाल- (Chiplun Nagarparishad Result 2025)
नगराध्यक्ष (उमेश सकपाळ : शिवसेना)
शिवसेना..... 9भाजप....... 8उबाठा.....5काँग्रेस.... 3राष्ट्रवादी.... 2शरद पवार राष्ट्रवादी... 1
रायगडमधील रोहाचा निकाल- (Roha Nagarparishad Result 2025)
प्रभाग क्रमांक 1 अ राष्ट्रवादी विजयी - नीता महेश हजारे
प्रभाग क्रमांक 1 ब राष्ट्रवादी विजयी - प्रशांत कडू
प्रभाग क्रमांक 2 अ राष्ट्रवादी विजयी - फराह पानसरे
प्रभाग क्रमांक 2 ब बिनविरोध राष्ट्रवादी विजयी- राजेंद्र जैन बिनविरोध
रायगड. रोहा प्रभाग क्रमांक 3 अ राष्ट्रवादी विजयी - अफ्रिन रोगे
प्रभाग क्रमांक 3 ब राष्ट्रवादी विजयी - अरबाज मणेर
प्रभाग क्रमांक 4 अ राष्ट्रवादी विजयी - स्नेहा अंबरे
प्रभाग क्रमांक 4 ब राष्ट्रवादी विजयी- अहमद दर्जी
रायगड. रोहा प्रभाग क्रमांक 5 अ राष्ट्रवादी विजयी - आलमास मुमेर
प्रभाग क्रमांक 5 ब राष्ट्रवादी विजयी - महेंद्र गुजर
प्रभाग क्रमांक 6 अ राष्ट्रवादी विजयी - गौरी बारटक्के
प्रभाग क्रमांक 6 ब राष्ट्रवादी विजयी- महेंद्र गुजर
प्रभाग क्रमांक 7 अ राष्ट्रवादी विजयी - प्रियांका धनावडे
प्रभाग क्रमांक 7 ब राष्ट्रवादी विजयी - रवींद्र चाळके
प्रभाग क्रमांक 8 अ राष्ट्रवादी विजयी- संजना शिंदे
प्रभाग क्रमांक 8 ब राष्ट्रवादी विजयी- महेश कोलटकर
प्रभाग क्रमांक 9 अ शिवसेना -सुप्रिया जाधव
प्रभाग क्रमांक 9 ब भाजपा विजयी - रोशन चाफेकर
प्रभाग क्रमांक 10 अ राष्ट्रवादी विजयी- पूर्वा मोहिते
प्रभाग क्रमांक 10 ब राष्ट्रवादी विजयी- अजित मोरे
खेड नगरपरिषद- (Khed Nagarparishad Result 2025)
नगराध्यक्ष : माधवी बुटाला (शिवसेना)
नगरसेवकशिवसेना (17)भाजप (3)
माथेरान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 निकाल- (Matheran Nagarparishad Result 2025)
प्रभाग क्रमांक 1केतन रामने : शिवसेना शिंदे गट : विजयीअनुसया ढेबे : राष्ट्रवादी अजित पवार गट : विजयी
प्रभाग क्रमांक 2सिताराम कुंभार : राष्ट्रवादी अजित पवार गट : विजयीलता ढेबें : शिवसेना शिंदे गट : विजयी
प्रभाग क्रमांक 3रिजवाना शेख : शिवसेना शिंदे गट :विजयी शिवाजी शिंदे : शिवसेना शिंदे गट : विजयी
प्रभाग क्र 4गौरंग वाघेला : शिवसेना शिंदे गट : विजयी सौ.प्रतिभा घावरे : भाजपा : विजयी
प्रभाग क्र 5सचिन दाभेकर : शिवसेना ठाकरे गट विजयीकमल गायकवाड : शिवसेना शिंदे गट विजयी
प्रभाग क्र 6सोहेल महापुळे : शिवसेना शिंदे गट विजयी सौ सुरेखा साळुंखे : शिवसेना शिंदे गट विजयी
प्रभाग क्र 7संतोष शेलार : शिवसेना शिंदे गट विजयी अनिता रांजाणे : राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी
प्रभाग क्रमांक 8 किरण पेमारे : राष्ट्रवादी अजित पवार गट विजयीसौ. अर्चना भिल्लारे : शिवसेना शिंदे गट विजयीप्रभाग क्र.9ऐश्वर्या तोरणेसुनील शिंदे
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निकालाचे सर्व अपडेट्स, VIDEO:
संबंधित बातमी:
Nagaradhyaksha winners list: महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची यादी वाचा एका क्लिकवर