Nagpur News : सरसंघचालक मोहन भागवतांच्या (Mohan Bhagwat) वक्तव्यावरुन चांगलंच राजकारण सुरु झालं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.  हा बदल योग्य बदल आहे. पण फक्त माफी मागून चालणार नाही. तर आपण व्यवहारात या सगळ्या वर्गाच्या संबंधिची भूमिका कशी घेतोय, यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, असं शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटलं आहे. मोहन भागवत यांनी काल नागपुरात झालेल्या कार्यक्रमात ब्राम्हण समाजाने भूतकाळातील चुकांबद्दल पापक्षालन करायला हवे असं म्हटलं होतं. यावर शरद पवारांनी नागपुरात (Nagpur) पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. 


काय म्हणाले होते सरसंघचालक


नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत त्यांनी ब्राम्हण हा जन्माने नाही तर क्रमाने ठरत असतो. धर्मशास्त्रात देखील हेच सांगितलं आहे. मात्र मधल्या काळात जातीभेदाची चौकट घट्ट झाली आणि मानवाला मान खाली घालायला लावणारे कृत्य घडले . त्यामुळं आपण पापक्षालन करायला हवं असं म्होऊन भागवत म्हणालेत. 


शरद पवार आणखी काय म्हणाले...


शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने पुरावे मागितले आहेत. आता निर्णय लागू शकतो, याबाबत विचारले असता, मला याबाबत सांगण्‍याचं काही कारण नाही. निवडणूक आयोग यासंबंधीचा निकाल देईल. तो निकाल राजकीय पक्षांना मान्य करावा लागेल, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी म्हटलं.  एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. त्या कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेऊन त्यांना रूजू करून घेण्यात आले आहे. यावर प्रश्‍न विचारला असता, तो सरकारचा निकाल आहे, सरकारच त्याबाबत काय ते बोलेल, असे शरद पवार म्हणाले.


निवडणूकीसंदर्भात करणार चर्चा


नागपुरात भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन होणार आहे. येथे पवार हजेरी लावणार आहेत. यासोबतच आगामी निवडणुकीसंदर्भातही चर्चा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.


इतर महत्त्वाच्या बातम्या


सरसंघचालकांचं महत्वाचं वक्तव्य; म्हणाले, 'मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले हा आपला इतिहास'


Nagpur Crime : मॅट्रिमोनियल साईटवरुन 15 महिलांना जाळ्यात ओढलं; ठगाला बेड्या, जुगार, सट्ट्यावर उडवायचा पैसे