Jitendra Awhad sloganeering in front of Gopichand Padalkar : काही दिवसांपूर्वी भाजपचे जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विधानभवनात गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) उपस्थित असताना "मंगळसूत्र चोराचा...मंगळसूत्र चोराचा..", अशा घोषणा दिल्या आहेत. त्यामुळे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही नाव न घेता त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिलंय.
गोपीचंद पडळकर पवार कुटुंबाबाबत नाव न घेता काय म्हणाले होते?
सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा अन् आई दुसरीच, पुण्यात असं एक कॉकटेल घर आहे, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांंनी पवार कुटुंबियावर निशाणा साधला होता.
गोपीचंद पडळकर यापूर्वी देखील शरद पवारांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना पाहायला मिळाले आहेत. यापूर्वी त्यांनी शरद पवारांचा उल्लेख 'महाराष्ट्राला लागलेला कोरोना', असा केला होता. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये नेहमीच शाब्दिक हल्ले झालेला पाहायला मिळाले आहेत. शरद पवारांच्या एका कार्यकर्त्याने गोपीचंद पडळकर यांची गाडी देखील फोडली होती. दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी जेव्हा जेव्हा शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका केलीये. त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने चोख प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे.
गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादीकडून मंगळसूत्र चोरल्याचा आरोप
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकदा गोपीचंद पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोरल्याचा आरोप केला आहे. "गोपीचंद पडळकर ही एक वाईट प्रवृत्ती आहे. त्यांनी पवार कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा वापरली. ज्यांना ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक निवडणुकांमध्येही विजय मिळवता येत नाही, अशा लोकांना भाजपकडून मोठी पदं देण्यात येतात आणि त्यांच्याकडून विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांविरोधात खालच्या भाषेत बोललं जातं. याच पडळकरांवर मंगळसूत्र चोरीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत अटक केली होती. त्यामुळे अशा व्यक्तीला पवार कुटुंबावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. महाराष्ट्रातील जनता लवकरच अशा वर्तनाचं योग्य उत्तर निवडणुकीतून देईल", असं प्रत्युत्तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी दिलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या