Jitendra Awhad on Amol Mitkari  : "मी राजकीय वय बघून स्टेटमेंट देत असतो. अमोल मिटकरींचे राजकीय वय अजून तीन वर्षे देखील नाही. अजून तो रांगणारा बालक आहे. 5000 रुपयांवर स्वतःचं ज्ञान विकणारा माणूस होता. ते अजित दादांना आवडलं, चांगला पाठांतर करतो. माझी किती वर्षे राजकारणात गेली ते पवार साहेबांनी सागितलंय " असं म्हणत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्लाबोल केलाय. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. 


जितेंद्र आव्हाड म्हणाले, माझी किती वर्षे राजकारणात गेली ते पवार साहेबांनी सागितलंय. माझ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, तो राष्ट्रीय पातळीवरून काम करत आणलेला माणूस आहे .त्याला कुठे काय बोलायचं त्याला मार्गदर्शन करू नका. तो जे बोलतो ती पक्षाची भूमिका असते.त्यामुळे माझं राजकीय वय शरद पवारांनीच सांगितलं आहे.


शरद पवार हा माणूस कधी मरतोय हा विचार करतात


पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार हे खूप उंची असलेला माणूस आहे,असे सुप्रीम कोर्ट म्हणाले. त्यांचे नेते मनात हा माणूस कधी मरतोय  हा विचार करतात. दुसरीकडे नाटक म्हणून श्रद्धेय शरद पवार असे म्हणतात. पटत नाही तर नाव कशाला घेतात. शरद पवार यांचं नाव वापरू नका हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. शरद पवार काहीच केले नाही,सर्व केले ते त्यांनीच केले, असंही जितेंद्र आव्हाडांनी नमूद केलं. 


अजित पवार भोळा माणूसय 


दादा खरंच मोकळ्या मनाचा माणूस आहे. तसाच भोळाही आहे. बघा ना, उभ्या महाराष्ट्राला सांगितले की, मी मोक्कातला आरोपी सोडवला. २५ हजार कोटींचा इन्कमटॅक्स माफ करून घेतला. भारतात सत्ताधाऱ्यांकडून हे देखील घडू शकते, हे सांगणारा माणूस भोळा नसेल का? पण, काय दुर्दैवं आहे. आमच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हेपण आम्ही काढू शकत नाहीत, असेही आव्हाड यावेळी बोलताना म्हणाले.


25 हजार कोटींचा आयकर माफ होऊ शकतो, हे आश्चर्यकारकच आहे


ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, त्यांना मदतही करू शकत नाही. या देशात कायदा नमवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची किती चालते, हे सगळं दादा आपल्या तोंडून सांगून गेले. म्हणजे पोलिसांकडून मोक्कासुद्धा गरीबालाच लावतात आणि ज्याचा राजकीय वशिला असतो, त्याला सोडून देतात. इन्कमटॅक्सच्या धाडी कोणावर पडतात, हे मला माहित नाही; पण, 25 हजार कोटींचा आयकर माफ होऊ शकतो, हे तर आश्चर्यकारकच आहे. पण असो, दादांच्या शब्दातून येथील कारभार कसा उत्तमरित्या सुरू आहे याची "गॅरंटी" देण्यात आली, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Eknath Khadse: पंतप्रधान मोदींनी काम केलंय का, कोंडीत पकडणाऱ्या प्रश्नावर एकनाथ खडसेंचा सेफ गेम, म्हणाले...