Sanjay Shirsat on Chhagan Bhujbal : खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) हेमंत गोडसे हेच (Hemant Godse) उमेदवार असतील, अशी घोषणा केली. यामुळे भाजपच्या (BJP) इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे.  हेमंत गोडसेंचा नावाला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. तर मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) उमेदवाराबाबत निकाल होत नाही तोपर्यंत नाव जाहीर केलेच कसे? असा सवाल श्रीकांत शिंदेंना केला आहे. यावर शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


संजय शिरसाट म्हणाले की, श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये (Nashik Lok Sabha 2024) जी उमेदवारी घोषित करण्याचा प्रयत्न केला त्याला तुम्ही एवढे गांभीर्याने का घेत आहात? अधिकृतपणे त्यांनी काहीही बोलले नाही. पण हेमंत गोडसे नाशिकला दोन टर्मपासून खासदार आहेत. त्यांचे चांगले काम असल्याने त्यांना उमेदवारी मिळावी ही इच्छा सांगण्यात आली. हे नैतिकतेचे धडे जर आम्हाला द्यायचे असतील तर बाकी मतदारसंघात काही लोकांना जे काही सांगण्यात आले आहे. त्याला काय म्हणणार? तिथे तुम्ही तुमचा उमेदवार अघोषित जाहीर केलेलाच आहे. म्हणून चुकून एखादा शब्द निघाला तर त्याचे एवढे मोठे भांडवल करण्याची गरज नाही. 


म्हणून कुणाला वाईट वाटण्याचे कारण नाही


एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) चिरंजीव म्हणून नाही तर गोडसे यांच्या सोबत खासदार म्हणून लोकसभेत केलेल्या कामाचा श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) अनुभव आहे. म्हणून त्यांनी एखाद नाव घोषित करण्याचा प्रयत्न जरी केला असेल तरी त्याला अधिकृत एकनाथ शिंदेंनी दुजोरा दिलेला नाही. म्हणून कुणाला वाईट वाटण्याचे कारण नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


काय म्हणाले होते छगन भुजबळ?


भाजपकडून हेमंत गोडसेंना विरोध होणे हे स्वाभाविकच आहे. उमेदवाराबाबत निकाल होत नाही तोपर्यंत श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंचे नाव जाहीर केलेच कसे? असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला. श्रीकांत शिंदेना उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार नाही. युतीत सगळ्यांनी थोडीशी शिस्त पाळली पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik Lok Sabha 2024 : 'नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेकडे पण...'; संकटमोचक धावून आले इच्छुकांच्या मदतीला!


Nashik : कुणाला विचारून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली? नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा श्रीकांत शिंदेंना सवाल