Jitendra Awhad : निवडणुकांमध्ये टीका होतात, पण जेव्हा 2019 मध्ये 162 आमदार जमले तेव्हा कर्ता करविता मीच होतो, त्यामुळे आताही टीका होणार असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. आणखी काय म्हणाले आव्हाड? 


 एकला चलो रे ची घोषणा होण्याची शक्यता
आज ठाण्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली झाली, आम्ही एकत्रित पणे एक निर्णय घेतला आहे, महाविकास आघाडी करायची आहे, आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत, आता आम्ही कोणीही काहीही बोलणार नाही, इतर कोणी जरी काही बोलले तरी आम्ही प्रतिक्रिया देणार नाही, जसे संजय राऊत यांच्या पाठीशी सुप्रिया सुळे उभे राहतात, तसेच आम्ही सर्व नेत्यांना एकत्रित घेऊ, कार्यक्रत्यांचे मनोमिलन होणे गरजेचे आहे, आम्ही आमची भूमिका मांडली आहे, आमच्या तर्फे आनंद परांजपे बोलतील, प्रत्येक जिल्ह्यातून 3 नेते आघाडी साठी बोलतील,  यावेळी एकला चलो रे ची घोषणा होण्याची शक्यता असून भाजप हाच आपला शत्रू आहे असे आव्हाड पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 


162 आमदार जमले तेव्हा कर्ता करविता मीच होतो
मी त्यांच्या लोकांना बोलणार नाही, त्यांचा नेता मी नाही, पण त्यांचा नेता जर बोलत असेल तर इतरांनी बोलू नये असे असते, महापालिकेच्या निवडणुकीत 50 100 मतांचा फरक पडू शकतो, तसे होऊ नये यासाठी प्रयत्न करणार
निवडणुकांमध्ये टीका होतात, पण जेव्हा 2019 मध्ये 162 आमदार जमले तेव्हा कर्ता करविता मीच होतो, त्यामुळे आताही टीका होणार. मिनिमम कॉमन प्रोग्रॅम वर चर्चा केली जाईल, मी माझ्या पक्षाकडून सांगतोय, असे आव्हाड म्हणाले.


प्रसंगी मी गोळ्या खाईन पण...
रेल्वे जमीन संदर्भात बोलताना लाखो लोकांना बेघर करण्यासाठी जनरल डायर यावा लागेल, पण कोणीही आले तरी मी झोपड्या तोडू देणार नाही, प्रसंगी मी गोळ्या खाईन पण काही कारवाई होऊ देणार नाहीत,


 क्लस्टरचे धोरण कोणी जाहीर केले?
आव्हाड पुढे म्हणाले, क्लस्टरचे धोरण कोणी जाहीर केले? पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले, त्यासाठी आम्ही पायी चालत गेलो, उपोषण केले, लोकं विसरत नाहीत, नारळ कोणीही फोडू देत, कुदळ कोणी मारली हे लोकांना माहीत आहेत, 


आता राजकारणात बायका, सुना, मुलं सर्वांनाच टार्गेट करतात,
महाराष्ट्राचे राजकारण आधी असे नव्हते, वसंतराव चव्हाण यांचे संस्कार या महाराष्ट्रावर आहेत, जेव्हा वसंतराव चव्हाण यांना सांगितले की दुसरे लग्न करा, त्यांनी जाहीर पणे सांगितले की दोष तिच्यात नाही माझ्यात आहे, असे वसंतराव चव्हाण होते, 
कधीही राजकारणात घरातील व्यक्तींना घेतले गेले नव्हते, आता काय, बायका, सुना, मुलं सर्वांनाच टार्गेट करतात, संपूर्ण घर अस्वस्थ करतात,


आव्हाडांना पुन्हा निमंत्रण नाही, 
महापालिकेचा आज एक भूमिपूजन सोहळा आहे त्याला कॅबिनेट मिनिस्टर असून आव्हाड यांना निमंत्रण नाही, त्यावर आव्हाड म्हणाले, कदाचित पालिका प्रशासन शहरात अजून एक कॅबिनेट मिनिस्टर राहतो हे विसरले असेल, जे मला तुम्ही विचारता ते आयुक्तांना विचारा, ते मला बोलावत नाहीत,आणि मला पण जायची गरज नाही.


हेही वाचा



दिशा सालियनची आत्महत्या नाही तर बलात्कार करुन हत्या; त्यावेळी तिथं कोण मंत्री होता? नारायण राणेंचा सवाल