Jayant Patil On Raver Loksabha : भारतीय जनता पक्षाने बुधवारी (दि.13) लोकसभा निवडणुकीची दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये भाजप नेत्या रक्षा खडसे यांचे देखील नाव आहे. त्यांना भाजपने रावेरमधून उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून रावेरच्या मतदारंसघात तगडा उमेदवार देण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. रक्षा खडसेंविरोधात शरद पवार गटाच्या नेत्या रोहिनी खडसे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे संकेत शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहेत. त्यामुळे बारामतीनंतर आणखी एका मतदारसंघात नणंद भावजय आमने-सामने येणार का? असा प्रश्न निर्माण झालाय. 


येत्या दोन तीन दिवसात निर्णय होईल


जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, रावेर मधून रोहिणी खडसे देखील उमेदवार असू शकतात. काल रात्री जळगांवचे पदाधिकारी सोबत बैठक झाली, रोहिनी यांच्या नावावर ही चर्चा झाली. महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप अधिकृतरित्या झालेले नाही. मात्र, येत्या दोन तीन दिवसात निर्णय होईल. रोहिनी खडसे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, असं जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्ट केले. 


निलेश लंकेंबाबत काय म्हणाले जयंत पाटील? 


जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, निलेश लंके शरद पवार यांना भेटण्यासाठी आज येत आहेत. निलेश लंके लोकांमधले नेते आहेत ते पक्षात आले तर स्वागतच आहे. ज्या आमदारांनी सह्या केल्यात त्यांना माहिती नाही कशावर सही केली, त्यापैकी निलेश लंके एक आहेत. आमचे जागा वाटप अजून झाले नाही पण निलेश लंके एक चांगला चेहरा आहे, असं जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावेळी बोलताना नमूद केलं आहे. 


एकनाथ खडसे आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा


भारतीय जनता पक्षाने रक्षा खडसे यांना रावेर मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांच्या एक बैठक पार पडली. रावेरच्या जागेबाबत एकनाथ खडसे आणि शरद पवार यांच्यामध्ये बंददाराआड चर्चा झाली. रक्षा खडसे 2019 मध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. त्यामुळे त्याच्याविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीकडून रस्सीखेच सुरुच आहे. दरम्यान, जयंत पाटलांनी रोहिनी खडसेंच्या उमेदवारीचे संकेत दिल्याने आणखी एका मतदारसंघात नणंद भावजय आमने-सामने येणार असे बोलले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Jayant Patil : निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार का? जयंत पाटलांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या!