Jayakumar Gore on OBC Reservation: ओबीसी समाजाच्या हक्कासाठी जे देवेंद्रजींनी (Devendra Fadnavis) सोसले आहे तो अन्य कोणीही सोसलेले नाही. त्यांच्यावर झालेले शाब्दिक, वैचारिक आणि वैयक्तिक पातळीवर झालेले हल्ले असतील किंवा त्यांना टार्गेट केलं गेलं असेल. जबादारीने मी सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर कोणतीही गदा येणार नाही, अडचण येणार नाही यासाठी मी आश्वस्त करतो. ओबीसी, मराठा समाजबांधवाना विनंती कि तुम्ही GR बघावं, त्याचे परिणाम बघावे, त्यातून आपले मतं बनवावे. समाज व्यवस्था बिघडणार नाही, ही व्यवस्था अस्वस्थ होणार नाही अशी विधान कोणी करू नये. अशी प्रतिक्रिया देत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी ओबीसी आंदोलनावर भाष्य केलंय.
आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे. मात्र सरकार म्हणून आमचे एवढेच सांगणे आहे कि सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाच्या हक्काचे रक्षण करताना ओबीसी समाजाचे हक्काचे रक्षण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि आम्हा सगळ्यावर आहे. मुख्यमंत्री फडणवीस या बाबतीत एकदम ठाम आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने काळजी करू नये. असेही जयकुमार गोरे म्हणाले.
त्यांनी खुदके गिरेबान मे कभी झाँककर देखना चाहिये- जयकुमार गोरे
निरेच्या पाण्याचा प्रश्न ज्यांनी उपस्थित केला त्यांना माझ सांगणं आहे कि, त्यांनी खुदके गिरेबान मे कभी झाँककर देखना चाहिये. आपण स्वतः आपल्याकडे बघितलं पाहिजे आपण काय करतोय ते. मी जेव्हापासून पालकमंत्री झालोय तेव्हापासून अवैध वाळू, मुरूम किंवा कुठलाही अवैध व्यवसाय चालू देणार नाही, ही भूमिका मांडली होती. ज्यांनी अवैध धंदे केले त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि अजूनही कारवाई चालू आहे. 100 टक्के थांबलं असं मी म्हणणार नाही, पण बहुतांश ठिकाणी आम्ही आळा घातला आहे. अजूनही काही ठिकाणी उपसा सुरु असल्याची तक्रार आहे. मी त्याबाबतीत तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. कधी नव्हे ते MPD कायद्याने आपण अशा लोकांवर कारवाई केली. असेही जयकुमार गोरे म्हणाले.
प्रत्येक अधिकाऱ्यांच्या पाठीशी मी उभा आहे - जयकुमार गोरे
दुसरीकडे, अजितदादांच्या बाबतीत त्यांनी स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जो प्रकार घडला त्याचं समर्थन कोणी करणार नाही पण गैरसमजातून झालेला हा प्रकार आहे. पण या विषयाच राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतोय. इथं बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभा आहे. कुठल्याही बाबतीत कुठल्याही अधिकाऱ्यावर दबाव टाकता येणार नाही. दबाव आला तर प्रशासनाच्या पाठीशी मुख्यमंत्री उभे आहेत. चांगलं काम करणाऱ्या, बेकायदेशीर कामांना आळा घालणाऱ्या, लोकांभिमुख कामं करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांच्या पाठीशी मी उभा आहे. असेही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या