OBC Reservation Mumbai: पुढील दोन दिवस मुंबईत ओबीसी समाजाच्या महत्त्वाच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरमुळे साशंक असलेल्या ओबीसी नेत्यांची (OBC Reservation) सोमवारी मुंबईत बैठक होणार आहे. तर इतर मागास व बहुजन कल्याण मंत्र्यांनीही 9 सप्टेंबर रोजी ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी बैठक बोलावली आहे. ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी "इतर मागास व बहुजन कल्याण" मंत्री अतुल सावे यांच्या विभागातर्फे 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता मुंबईत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 4 सप्टेंबर रोजी नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी लवकरच शासन स्तरावर बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर या बैठकीचे मुंबईत आयोजन करण्यात येत आहे.

Continues below advertisement


दुसऱ्या बाजूला 8 सप्टेंबर रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या जीआर संदर्भात साशंक असलेल्या विदर्भातील ओबीसी नेत्यांची काल नागपुरात रविभवन येथे विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात बैठक झाली होती. त्यात 8 सप्टेंबर रोजी मुंबईत राज्यभरातील ओबीसी नेत्यांची यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये बैठक घेण्याचे ठरले होते. त्यामुळे आता मुंबईत 8 सप्टेंबर रोजी सरकारच्या जीआर संदर्भात साशंक असलेल्या ओबीसी नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये होईल. तर दुसऱ्या बाजूला शासन स्तरावर ओबीसींच्या प्रलंबित मागण्यासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने 9 सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारने काढलेल्या जीआरमुळे ओबीसींच्या आरक्षणाला कुठेच धक्का बसत नसल्याचे आधीच म्हटले आहे.


Laxman Hake: लक्ष्मण हाकेंकडून राज्यव्यापी संघर्ष यात्रेचे संकेत


ओबीसी काय आहे हे आम्ही महाराष्ट्र आणि देशाला दाखवून देणार आहोत. येत्या दोन दिवसांत ओबीसी संघर्ष यात्रेची घोषणा करणार, असे लक्ष्मण हाके यांनी रविवारी बीडच्या भोगलवाडी येथील भाषणात सांगितले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार तुम्ही मंडल यात्रा काढली आपण ती दोन दिवसात बंद केली. आमच्या नादाला लागायच्या भानगडीत पडू नका पवार साहेब. पवार साहेब तुम्ही सगळी पदं घरात घेतली. मुंडे साहेब असते तर महाराष्ट्राला या परिस्थितीला सामोरे जावं लागलं नसते. मुंडे साहेब विलासराव देशमुख खांद्याला खांदा लावून चालत होते. आपल्याला ओबीसी संघर्ष यात्रा काढायची आहे. ओबीसींचा आणखी पूर्ण विकास झालेला नाही. आम्ही जात वर्चस्वाची भाषा केली नाही. क्रांतीसिंह नाना पाटलांना आम्हीच निवडून दिले. क्रांतिसिंह नाना पाटील भगवान बाबाच्या चरणावर मस्तक टेकवलं होते, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.


बीड जिल्ह्यातील भोगलवाडी येथे काल ही सभा पार पडली. या सभेला मोठ्याप्रमाणावर गर्दी होती. याबाबत बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, महाराष्ट्र बघेल की भोगलवाडीत किती गर्दी झाली. महाराष्ट्र आपल्याला पाहत आहे. सभेसाठी पोरं पाच किलोमीटर पायी चालत आली आहेत. गोपीनाथ मुंडेंनी आम्हाला स्वाभिमान शिकवला. जरांगेना स्टेजवरच्या बॅनरचा फोटो काढून पाठवा. तुम्ही कुणाचे फोटो टाकले? आमचे ओबीसी नेते बोलत नाहीत कारण ते या सगळ्यासाठी जबाबदार आहेत, अशी टीकाही लक्ष्मण हाके यांनी केली.


धनंजय मुंडे, पंकजा मुंडे कधीही वेडवाकडं बोलले का? सोळंकेच्या घरावर हल्ला झाला त्यावेळेस छगन भुजबळ त्यांना भेटायला गेले होते. सुंदरराव सोळंके उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेस तुमची जात आडवी आली नाही का? सोळंकेना जरा पाठिंबा द्यायचा आहे तर द्यावा पण आधी त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. देवेंद्र फडणवीस आम्ही तुमच्याकडे बघून मतदान दिलं पंडित आणि सोळंकेकडे बघून नाही. लातूर, धाराशिव, नांदेड या ठिकाणी दोन नंबरला असलेल्या धनगर समाजाचा आमदार झाला नाही. महाराष्ट्र आमचा आहे. नंतर चार पिढ्यांनी तुम्हाला मतदान दिले आहे. महाराष्ट्र बघायचं असेल तर पोहरा देवी, भगवानगडावर, माळेगावच्या खंडोबाला, यावं लागेल. मुंडे साहेब बंजारा आणि वंजारी समाजाला वेगळं मानत नव्हते, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले.



आणखी वाचा


मराठा आरक्षणाचा GR बेकायदेशीर, ओबीसी आरक्षण संपुष्टात, लक्ष्मण हाके म्हणाले, त्या नेत्यांवर बहिष्कार टाकणार!