Manoj Jarange On Devendra Fadanvis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांच्या नावाने एरवी खडे फोडणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी चक्क देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलंय. परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क माफ करत मुलींना मोफत शिक्षण दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे कौतुक करत आमचा विरोधक छगन भुजबळ असल्याचे मनोज जरांगे म्हणालेत.
जालन्यातील अंतरवाली सराटीत आज त्यांनी पाचव्यांदा आमरण उपोषणास सुरुवात केली असून सकाळीच त्यांनी मराठा समाजातील मुलांना नोकर भरती ऍडमिशनमध्ये अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार केली होती.
फडणवीस साहेबांचे याबाबत कौतुक - मनोज जरांगे
ईबीसी, ईडब्ल्यूएस आणि एसबीईसी उमेदवारांकडून परीक्षा शुल्क आणि फीस घेऊ नका असे आदेश सरकारने दिल्याबद्दल मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारचे कौतुक केले आहे. ज्यांनी परीक्षा शुल्क, फीस भरली आहे त्यांना ते शुल्क वापस करा असे म्हटलंय. "या बद्दल फसणवीस साहेबांचे, शिंदे, अजित पवार साहेबांचे मनापासून कौतुक" असं म्हणत आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देणं सुलभ करण्याची विनंती मनोज जरांगे यांनी सरकारला केली.
सरकार विरोधात आक्रमक होणारे मनोज जरांगे यांनी अचानक सरकारचे कौतुक केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बारस्कर यांना कधी विरोधक मानले नाही
काही महिन्यांपूर्वी उपोषण करते मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करणारे अजय महाराज बारस्कर यांना कधीही विरोधक मानले नाही. आमचा खरा विरोधक छगन भुजबळ आहे असं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांवर निशाणा साधलाय.
अजय महाराज बारस्कर यांची गाडी जाळण्यात आल्यानंतर बारस्कर आक्रमक झाला असून त्यांनी थेट सागर बंगल्यावर ठिय्या आंदोलन सुरू केल्याचे दिसून आलं. त्यानंतर त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतला आहे.
आईची जात लेकराला लागत नाही यांची खंत
आईची जात लेकराला लागत नाही याची खंत व्यक्त करत ओबीसी प्रमाणपत्र देणं आम्हाला सुलभ करून द्यावं अशी विनंती मनोज जरांगे यांनी केली आहे. दरम्यान केसेस मागे घ्या, आम्ही जातीयवादी नाही असं म्हटलंय.
तुम्ही व्हॅलिडिटीची अट कशाला ठेवली?
Ecbc दिल्यानंतर सरकारने ews बंद केले आहे, ते सुरू ठेवा. सरकारने मुलींना मोफत शिक्षण केले आहे. मात्र मुलींना मोफत शिक्षण मिळत नाही. तुम्ही व्हॅलिडिटी अट कशाला ठेवली? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. चंद्रकांत दादा नुसतेच म्हणत आहे, मुलींना मोफत शिक्षण देत आहोत. मात्र ते दिले गेले नाही. मुलींना मोफत शिक्षण द्यायचे असेल तर त्यात भेदभाव करू नका, असे त्यांनी म्हटले.