Manoj Jarange: राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या विषयावर राजकारण तापलेले असताना विरोधक सत्ताधारी आणि मनोज जरांगे यांची एकमेकांना टीका प्रत्युत्तरे सुरू आहेत. आता त्यांनी प्रकाश आंबेडकरांसह पंकजा मुंडेंवरही निशाणा साधलाय. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या आरोपांवर माझा विश्वास बसत नाही. हे माझ्यासाठी शॉकिंग असल्याचा जरांगे म्हणालेत. 


मला माझ्या समाजाची शक्ती वाढवायची आहे. ते माझं स्वप्न आहे. मराठा समाज मोठा होऊ नये हे अनेकांचे स्वप्न आहे त्यामुळे बच्चू कडूंनी ऑफर दिली असली तरी याबाबत 29 ऑगस्टला समाजाच्या बैठकीत निर्णय घेऊ असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. 


प्रकाश आंबेडकरांचा आरोप शॉकिंग 


प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपावर माझा विश्वासच बसत नाही. हे रोप माझ्यासाठी शॉकिंग असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. वंचित बहुजनचे प्रमुख  प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर नुकताच जरांगे पाटील यांच्यावर आरोप केला होता. सगे सोयरेच्या मागणीला विरोध करत मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशी टीका त्यांनी केली होती. देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांचे भांडण नकली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 


पंकजा मुंडेविषयी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मी नाही- जरांगे 


दरम्यान, मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे यांच्या बाबतीत मी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नाही असं म्हणत आरक्षणाला कोण विरोध करत हे सामान्य जनतेने समजून घेणे महत्त्वाचे आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. 


पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले असून जरांगे यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार असा टोला लगावत कोणी काहीही बोलेल त्यावर मी प्रतिक्रिया देणार नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या. विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर आज त्या बीडमध्ये आहेत. 


हेही वाचा:


Pankaja munde: राज्यातील वंचितबाबत स्ट्रॉंग भूमिका घेणार.. शपथविधीनंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच बीडमध्ये; म्हणाल्या, जरांगेनी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार..


Pankaja Munde: आमदारकी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचं भगवानगडावर भव्य स्वागत, पेढ्यांनी तुला, पंकजा म्हणाल्या, या प्रेमाला कोणत्याही जातीधर्माची किनार नाही