Lok Sabha Election 2024 : जळगाव (Jalgaon) लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले गेल्याच्या नंतर ते आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यांच्या या नाराजीनंतर त्यांच्या पत्नी संपदा पाटील या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार राहणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियासह काही माध्यमात होऊ लागल्या आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मात्र या शक्यतेचा स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. 


भाजप नेत्याच्या पत्नीला ठाकरे गटाकडून उमेदवारी?


जळगाव लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाकडून संपदा पाटील लढवणार निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा सध्या जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात पसरू लागल्या आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही. भाजपला तगडे आव्हान देण्यासाठी भाजपाचे नाराज असलेले विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात यावी, अशी खासदार उन्मेष पाटील समर्थकांची मागणी आहे. 


स्मिता पाटलांना उमेदवारी मिळाल्याने उन्मेष पाटील समर्थक नाराज


भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट केल्याने ते आणि त्यांचे समर्थक नाराज दिसत आहे. जळगाव लोकसभेत उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी अनेकदा दिल्लीवारी केली. मात्र, त्यांना यश मिळाले नाही, त्यांचे तिकीट कापून भाजपाने उमेश पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना  उमेदवारी दिली आणि उन्मेष  पाटील सह त्यांचे कार्यकर्ते भाजपावर नाराज झाले. उन्मेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मी पक्षावर कुठल्याही नाराज नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते.


लोकसभेचं तिकीट कापल्याने उन्मेश पाटील नाराज


आठ दिवसांपूर्वीच भाजपाच्या जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक जळगांव येथे घेण्यात आली या बैठकीमध्ये देखील उन्मेश पाटील हे गैरहजर दिसून आले. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मला बैठकीबाबत कुठलाही फोन किंवा एसएमएस आलेला नाही, त्यामुळे मी बैठकीला येऊ शकलो नाही. लोकसभेचं तिकीट डावल्यानंतर एकदाही उन्मेश पाटील हे जळगाव शहरात भाजपाच्या कार्यकर्ता किंवा पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसाठी आलेले नाही .यामुळे त्यांची नाराजी उघड दिसून आली आहे.


उन्मेष पाटीलांच्या पत्नी ठाकरे गटाकडून लढणार असल्याची चर्चा


भाजपाने उमेदवारी नाकारल्याने उन्मेष पाटील मागील आठवड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची गोपनीय भेट घेतली असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज मातोश्री दरबारात महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली यात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांचेही नाव त्या ठिकाणी चर्चेत घेण्यात आले असल्याच सांगण्यात येत असले तरी त्यांना उन्मेष पाटील किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कडून दुजोरा मिळू शकला नाही जळगाव लोकसभेत महाविकास आघाडी कडून भाजपाला तगडे आव्हान देण्यासाठी प्रबळ उमेदवारचा शोध  महाविकास आघाडी कडून घेण्यात येत आहे.


उन्मेश पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर?


भाजपाने तिकीट नाकारल्यापासून विद्यमान खासदार उमेश पाटील हे भाजपाच्या संपर्कात नाही मंत्री गिरीश महाजन यांनी देखील दोन वेळा संपर्क केला असल्याचे त्यांनी माध्यमांसमोर सांगितले होते त्यावेळी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले त्यामुळे खरोखर उन्मेष पाटील हे भाजपाच्या संपर्कात नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळे भाजपाला आव्हान देण्यासाठी उमेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना ते निवडणुकीच्या आखाड्यात उतरविणार असल्याचेही चर्चा सुरू आहे


उन्मेष पाटीलांच्या पत्नी संपदा पाटील ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात


संपदा पाटील या चाळीसगाव तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झालेल्या आहेत. विविध महिलांचे सामाजिक उपक्रम माझ्या माध्यमातून त्यांची चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात ओळख देखील निर्माण झाली आहे. त्यातच विद्यमान खासदार उमेश पाटील यांच्या पत्नी असल्याने जळगाव जिल्ह्यात त्या बऱ्यापैकी परिचित आहे. यामुळेच महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाने त्यांना उमेदवारी देण्याचा विचार केला जाईल, अशी खासदार उन्मेष पाटील यांच्या समर्थकांना आशा आहे.


भाजप नेत्याच्या पत्नीला ठाकरे गटाकडून उमेदवारी? महायुतीला शह देण्याची तयारी! 


या सगळ्याबाबत खासदार उन्मेष पाटील यांच्याशी एबीपी माझाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. मात्र, संपदा पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाच्या कडून निवडणूक लढवावी, यासाठी प्रयत्न करावा, अशी समर्थकांची इच्छा असल्याचं खासदार उन्मेश पाटील यांच्या निकटवर्तियांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी काळात खरच खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार राहतील का हाच चर्चेचा विषय बनला आहे.