Shiv Sena UBT Lok Sabha Marathwada Candidate List : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे. यावेळी पहिल्या टप्प्यात एकूण 17 मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील (Marathwada) एकूण 4 मतदारसंघातील देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, ज्यात हिंगोली (Hingoli), छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), धाराशिव (Dharashiv), परभणी (Parbhani) मतदारसंघाचा समावेश आहे. 


कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?



  • हिंगोली : नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar)

  • छत्रपती संभाजीनगर : चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) 

  • धाराशिव : ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) 

  • परभणी : संजय जाधव (Sanjay Jadhav) 


हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकरांना संधी...


हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदेडचे जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2014 मध्ये विजय मिळवला होता. सरपंच पदापासून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली होती आणि आज लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. 


चंद्रकांत खैरेंना पुन्हा उमेदवारी....


मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधून पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागच्या निवडणुकीत खैरे यांचा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला होता. आता पुन्हा खैरे मैदानात असणार असून, महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यावर संभाजीनगरमधील खरी लढत स्पष्ट होणार आहे. 


धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा संधी...


महाविकास आघाडीत धाराशिव लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनाच ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असून, मागील काही दिवसांत स्वतः उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघाचा दौरा देखील केला आहे. आता निंबाळकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली असून, महायुतीचा उमेदवार कोण असणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 


परभणीतून संजय जाधवांना उमेदवारी....


परभणी जिल्ह्याचे विद्यमान खासदार संजय जाधव यांना पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. विशेष म्हणजे शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर देखील परभणीमधील आमदार-खासदार उद्धव ठाकरेंच्या सोबत कायम राहिले. दरम्यान,  संजय जाधव यांची पक्षावरील निष्ठा पाहता त्यांना पुन्हा एकदा ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी : संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर; अंबादास दानवेंचा पत्ता कट