Imtiyaj jaleel: रामगिरी महाराज आपण स्वत:ची काळजी घ्या,सरकारला विनंती आहे की त्यांना Z सुरक्षा द्या. त्यांनी आपल्या लोकांपासून सुरक्षित आहे, हे लोक तुमच्या मागे पडू शकतात. आम्ही काही करणार नाही. धमकी नाही फक्त अलर्ट करत आहे असा इशारा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला दिलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाच दिवसांनंतर मुंबईकडे कूच करणार आहे, मुस्लिम समाजाने गाड्यांची सोय करून ठेवा, लवकरच तारीख सांगु. असा अल्टिमेटमच त्यांनी सरकारला दिलाय.महाविकास आघाडीला आम्ही प्रस्ताव दिला होता आता खूप वेळ झाल्यानं आम्ही निर्णय घेतोय असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलंय.


राज्यात रामगिरी महाराज यांनी मुस्लिमांच्या भावना दुखावणे विधान केल्यानंतर मोठा वादंग माजला होता. यावर इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सरकारवर जोरदार टीका केली.


काय म्हणाले इम्तियाज जलील?


वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल होऊन देखील कारवाई होत नसल्याने एमआयएमचे नेते इम्तियाज जलाल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र सरकारला आम्ही पाच दिवसांचा वेळ देतो, रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई करा अन्यथा मी आतापर्यंतची सर्वात मोठी रॅली घेऊन मुंबईला येणार असल्याचा इशारा जलील यांनी दिला आहे. संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते....


मुख्यमंत्री टपोरी नेत्यासारखं बोलले


जलील म्हणाले, मुख्यमंत्री टपोरी नेत्यांसारख बोलले रामगिरी महाराज यांचा केसाला धक्का लावू देणार नाही. रामगिरी महाराज यांच्यावर देशभरात 58 गुन्हे दाखल झाले आहेत...तीन दिवसांपूर्वीचा हा आकडा आहे. लोकांचा रोष असल्याने हे गुन्हे दाखल होत आहे, पण कारवाई होत नाही, पोलिसांचे हात बांधलेले आहेत,आपली गडचिरोलीला बदली होईल अशी पोलिसांना भीती आहे. नितेश राणे सारखे चिल्ले पिल्ले फडणवीस यांनी सोडले आहेत. वर्दीतील पोलीस म्हणजे RSSचे आणि एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आहे.  असेही जलील म्हणाले.


रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई करा अन्यथा 


न्यायालयात याचिका दाखल करण्यात आले आहे, पण न्यायालय म्हणते की सायबर पोलिसांच्या मदतीने ते वक्तव्य सोशल मीडियावरून काढून टाका. यावर याचिकाकर्त्यांनी बाजू मांडली असता न्यायालयाने म्हटले की तुम्ही आमच्यावर दबाव आणू शकत नाही. शेंबडे पोरं फडणवीस यांनी सोडले आहेत. सत्ता येते जाते तुम्हाला देखील एकदिवस घरी जायचं आहे. महाराष्ट्र सरकारला आम्ही पाच दिवसांचा वेळ देतो, रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई करा अन्यथा मी आतापर्यंतची सर्वात मोठी रॅली घेऊन मुंबईला येणार आहे.


मविआला प्रस्ताव देऊन खूप दिवस झाले, आता निर्णय घेणार


महाविकास आघाडीला आम्ही प्रस्ताव दिला होता एकत्र यायला तयार आहे, याबाबत त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यांनी वेळ मागितला होता, मात्र आता खूप वेळ झाला आहे....त्यामुळे आमचे साहेब ओवेसी 8 सप्टेंबरला येणार असून, आम्ही उमेदवार देण्याबाबत निर्णय घेत आहे. असे इम्तियाज जलील म्हणाले. उमेदवारी कुणाला द्यायची किंवा इतर गोष्टींबाबत चर्चा होणार असल्याचंही ते म्हणालेत.