Imtiyaj Jaleel: राज्यात रामगिरी महाराज यांच्या मुस्लिम विरोधी वक्तव्यानंतर नाशिकसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरींच्या बाजूने केलेल्या वक्तव्यानंतर आमदार नितेश राणे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांना प्रत्यूत्तर देण्यासाठी  एमआयएमचे नेते इम्तियाज जलील मुंबईत तिरंगा रॅलीसाठी रवाना झाले आहेत. वाढत्या जातीयवादाचा निषेध करण्यासाठी चलो मुंबई तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे.


रॅलीसाठी छत्रपती संभाजीनगरहून मु्ंबईला रवाना होताना ते म्हणाले, देश आणि महाराष्ट्र संविधानाने चालला पाहिजे  म्हणून ही तिरंगा रॅली घेऊन चाललोय.''


काय म्हणाले इम्तियाज जलील?


 ''कायद्याने राज्य चालत नाही नितेश राणे आणि रामगिरीवर एवढं बोलूनही कारवाई होत नाही. 60 एफ आय आर दाखल आहेत. मात्र अटक केली जात नाही आणि त्यामुळे संविधानाची प्रत देण्यासाठी मुंबईला चाललो आहे. मुंबईकरांचे हाल होतील त्यांची मी माफी मागतो पण, मुंबईकरांनी ही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला पाहिजे की कोण चुकीची  करत असेल तर त्यावर कारवाई का होत नाही. समृद्धी महामार्गावर काही टू व्हीलर आले आहेत. पण मी स्पष्ट सांगितलं होतं टू व्हीलर यांना पोलिसांनी परवानगी देऊ नये. आमची लोक गरीब आहेत म्हणून टपावर बसून येत आहेत. 


नितेश राणेला बोलण्याची मुभा आहे का?


 पोलीस आम्हाला सांगताय इथं तिथं जाऊ शकत नाही , आम्ही संविधान मानणारे आहोत. आम्हाला जायचं आहे ,आम्हाला तो अधिकार आहे. राजनैतिक दबाव आहे त्यामुळ गुन्हे दाखल होत नाहीय. महापुरुषांची, दैवी व्यक्तींचा अपमान होऊ नये यासाठी कायदा करण्याची गरज आहे. नितेश राणे जे बोलतो मग त्याला बोलण्याची मुभा आहे का, मला न्याय वेगळा आणि नितेशला न्याय वेगळा असे का? असा सवालही जलील यांनी केला.
आम्हाला अडवले तर बघू पण आता आम्ही निघतोय असे म्हणत ते मुंबईला रवाना झाले.


..म्हणून आम्ही मुंबईत जातोय


पोलीस आम्हाला सांगताय इथं तिथं जाऊ शकत नाही , आम्ही संविधान मानणारे आहोत. आम्हाला जायचं आहे.आम्हाला तो अधिकार आहे. मी जाती धर्म, विरोधात बोलायला जात नाहीय, तर राज्याची संस्कृती होती ते आपण विसरलो आहोत. येणारे लोक कुठल्या पक्षाचे नाही, लोक मशिदीत येऊन मारू म्हणतात आणि पोलीस गप्प बसतात, त्यावर कारवाई होत नसेल तर मी कुठलाही झेंडा न वापरता जातोय, मी सगळ्या पक्षाच्या लोकांना पत्र पाठवून यायचे आवाहन केले आहे.


यातही घाणेरडे राजकारण सुरुय..


आम्ही गंगापूर मार्गाने जाणार होतो मात्र यातही घाणेरडे राजकारण सुरुय, गंगापूर मध्ये हिंदुत्ववादी लॉक एक रॅली काढत आहे. त्यात काही घाणेरडे लोक आहेत म्हणून त्यांच्या सोबत वाद नको म्हणून आम्ही मार्ग बदलला आहे. 
आम्हाला राज्य सरकार कडून अपेक्षा होती, संविधान प्रमाणे देश चालतो असे वाटत होते मात्र अस दिसत नाही, कोर्टाकडून अपेक्षा होती तिथेही न्याय मिळाला नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत द्यायला जातोय. असे  जलील म्हणाले.