Mumbai: मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत . मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलन गुंडाळण्यासाठी आता राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे . ही नोटीस देताना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे . मनोज जरांगेंवर पोलिसांनी बळजबरी केली तर मुस्लिम समाज छातीचा कोट करून सर्वात पुढे असेल असे म्हणत MIM चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे यांना खंबीर पाठिंबा दर्शवलाय . मराठा आरक्षणावर एमआयएम पक्षाची भूमिका नेमकी काय ? भेटी दरम्यान काय झालं ? पाहूया सविस्तर (Imtiyaz Jaleel On Manoj Jarange)
काय म्हणाले इम्तियाज जलील ?
सुरुवातीपासून अगदी पहिल्या दिवसापासून जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं त्या दिवसापासून मी माझ्या पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर असेदुद्दिन ओवेसी यांनी लोकसभेत हा मुद्दा उचलला .जरांगे पाटलांची आरक्षणाची मागणी ही सरकारने पूर्ण करायला हवी अशी भूमिका मांडली होती . एवढे मोठे आंदोलन सुरू आहे तरी सरकार याकडे अजिबात गांभीर्याने बघत नाही .लवकरात लवकर याचा तोडगा काढा . मी जरांगे पाटलांचा मोठा फॅन आहे . मी त्यांच्यासोबत कायम आहे व राहणार असं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील म्हणाले .
MIM चा मनोज जरांगे पाटलांना पूर्ण पाठिंबा :इम्तियाज जलील
मनोज जरांगे यांना MIM चा 200% पाठिंबा आहे. मी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलीसांना सांगू इच्छितो की तुम्ही बळजबरी केली, तुम्ही आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला तर, आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जितक्या ताकदीने मराठा समाज रस्त्यावर उतरेल, तितक्याच ताकदीने मुस्लिम समाजही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सोबत राहणार. असं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील म्हणाले .
आंदोलन करण्याचा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे की नाही ? हरियाणा पंजाब मध्ये जेव्हा शेतकरी आंदोलन करत होते तेंव्हा महिनोन महिने ते आंदोलन चाललं . शाहीनबागचा आंदोलन महिनाभर चाललं . या आंदोलनामुळे सरकारला भीती का वाटते आहे ? पाच दिवसात सरकार नोटीशी देऊन सांगतो की आता घरी जा . करूद्या ना शांततेच्या मार्गाने आंदोलन .लोकशाही आहे .हुकूमशाही नाही आहे ." असंही ते म्हणाले.
'मनोज जरांगेंच्या चरणाशी राजीनामे टाका ..'
'तुम्हाला करायचं की नाही करायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे .जेव्हा तुम्हाला काही करायचं नसतं तेव्हा तुम्ही समिती गठीत करता .समितीवर समितीवर समिती हे धंदे सुरू आहेत .काहीतरी ठोस पाऊल उचलणं गरजेचं होतं .अपेक्षाही होती की उच्च न्यायालयाने हे आदेश सरकारला द्यायला पाहिजे होते .किया लोकांची मागणी नक्की काय आहे ? मागच्या एवढ्या वर्षांपासून हे लोक रस्त्यावर उतरत आहेत लढत आहेत .आंदोलन करत आहेत .मग त्यांना न्याय का मिळत नाही ? हे हायकोर्टाने सांगायला पाहिजे होता अशी आमची अपेक्षा होती .'
'रस्त्यावर आलेले हे सगळे लोक ग्रामीण भागातून आले आहेत .अस्सल मराठा महाराष्ट्रीयन लोक इथे आले आहेत .या लोकांनी विधानसभा आणि लोकसभेमध्ये आपल्या लोकांना पाठवला आहे .हे रस्त्यावर बसणार .त्रास सहन करणार .यांचे मोठे मोठे नेते एसी मध्ये बसणार .झोपा काढणार .माझी विनंती जरांगे पाटलांना आणि त्यांच्या सर्व समर्थकांना अशी आहे की मराठा समाजाच्या सगळ्या आमदार खासदारांना उचलून आणा .आणि जरांगे पाटलांच्या चरणापाशी तुमचा राजीनामा द्या .आणि एक संदेश पाठवा आम्हाला समाजाशी देणंघेणं आहे बाकी खुर्चीशी देणंघेणं नाही .कमीत कमी ज्या समाजाची लढाई इथे सुरू आहे त्यांनी तरी किमान सुरुवात करावी .असं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील म्हणाले .
'दीडशे च्या जवळपास आमदार आहेत मराठा समाजातले . मुस्लिम समाजासाठी हायकोर्टाने पाच टक्के आरक्षण शिक्षणासाठी दिलं होतं .मी जरांगे पाटलांना स्वतः सांगितलं होतं एकदा की आज आम्ही तुमच्यासोबत पूर्ण ताकदीने लढणार आहेत .तुम्हाला आरक्षण मिळाल्यानंतर आमच्यापेक्षाही आहे जेव्हा आम्ही आमच्या पाच टक्के आरक्षणासाठी लढाई सुरू करू तेव्हा त्याच ताकदीने तुम्ही आमच्या मागे उभे रहा '. अशी अपेक्षा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली .