पुणे: काँग्रेस नेत्याच्या एका खळबळजनक वक्तव्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. 19 डिसेंबर रोजी देशाचा पंतप्रधानच बदलणार आहे. देशाच्या पंतप्रधान पदी मराठी माणूस असेल असा दावा काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पिंपरी चिंचवड येथील एका कार्यक्रमादरम्यान केला आहे. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रदीर्घ काळ पीएमओ कार्यालयात काम केलेले आहे. दिल्लीत त्यांचे अजूनही चांगले संबंध आहेत. विशेष म्हणजे या महिन्यात त्यांनी दुसऱ्यांदा हा दावा केला आहे. तर या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत, अशातच पंतप्रधान पदासाठी संधी ही महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीतील कोणाला मिळण्याचा काही विषय नाही कारण आमची संख्या तेवढी नाही, तर नागपुरातील भाजपच्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.(Prithviraj Chavan) 

Continues below advertisement

Prithviraj Chavan: तर मग नागपूरच्या लोकांना संधी आहे...

मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो या पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावरून गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तर अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची जवळीत पाहिली तर काय एकंदरीत समीकरण दिसून येते या एका वृत्तवाहिनीच्या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, एक निश्चित आहे की काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा किंवा इंडिया आघाडीचा कोणी पंतप्रधान होणार नाही, कारण आमची तिथे संख्याच नाहीये, त्यामुळे झालं तर भाजपचा कोणीतरी होईल, जर असं काही अघटीत घडलं तर मग नागपूरच्या लोकांना संधी आहे, त्या संदर्भात मी बोललो होतो, असंही ते पुढे म्हणालेत.

Prithviraj Chavan: पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य नेमकं काय?

 येत्या 19 डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल, भारताचा पंतप्रधान बदलेल अन मराठी माणूस पंतप्रधान होईल, ती व्यक्ती भाजपचीच असू शकते, असं भाकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलं. पृथ्वीराज चव्हाणांनी हा दावा करताना जगात घडणाऱ्या घडामोडींचे संदर्भ दिलेत. अमेरिकेतील नव्या कायद्याचा ही दाखला चव्हाणांनी दिला. अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत, आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार आहे. अमेरिका सरकार एक कायदा करुन येत्या 19 डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे. असा दावा चव्हाणांनी केला. आता यात कोणाकोणाची नावं आहेत? याची मला फारशी कल्पना नाही. असं म्हणत चव्हाणांनी अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जनगणमन या पुस्तकाच्या प्रकाशन केल्यानंतर चव्हाणांनी भारतात 19 डिसेंबरला राजकीय भूकंप होण्याचं भाकीत केलं.

Continues below advertisement