Nagpur News : नागपुरात आज (रविवारी 14 डिसेंबर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (Rashtriya Swayamsevak Sangh) बौद्धिकाचे (RSS Bauddhik) आयोजन केलं आहे. या बौद्धिकाला महायुतीतील भाजप (BJP) आणि शिवसेनेचे  (MahaYuti) अनेक मोठे नेते उपस्थित राहणार असून अनेकजण आता रेशीमबागेतील डॉ.हेडगेवार स्मृती भवना दाखल झाले आहे. यावेळी संघ कार्याची माहिती भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना देण्यात येणार आहे. असे असताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मात्र आमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी आमंत्रण देऊनही पक्षातील आमदारांची अनुपस्थित राहिल्याचे बघायला मिळाले होते. परिणामी यावर्षी राष्ट्रवादीला आमंत्रणच दिलं नसल्याची माहिती आहे. दरम्यान, याच विषयी बोलताना संघाच्या बौद्धिकला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची, प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना दिलीय.

Continues below advertisement

भाजप- शिवसेनेचे आमदार स्मृतीभवनात दाखल, कुणा कुणाची हजेरी?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मंगलप्रभात लोढा

शिवेंद्रराजे भोसले

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

विक्रम पाचपुते

राम शिंदे

निलेश राणे

नितेश राणे

योगेश कदम

राजू तोडसाम

राणा जगजितसिंह

अमित गोरखे

शंकर जगताप

बबनराव लोणीकर

तुकाराम काते

सुधीर मुनगंटीवार

मेघना बोर्डीकर

श्रीकांत भारतीय

अशोक उईके

अतुल सावे

योगेश सागर

चंद्रकांतदादा पाटील

अर्जुन खोतकर

पंकज भोयर

चरणसिंह ठाकूर

अमित साटम

मुरजी पटेल

दिलीप बोरसे

काशीराम पावरा

Eknath Shinde : संघाच्या मुख्यालयात आलं कि देशभक्तीची प्रेरणा मिळते

नागपुराती हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान नागपुरात आज (रविवारी 14 डिसेंबर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बौद्धिकाचे (RSS Bauddhik) आयोजन केलं आहे. या बौद्धिकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह अनेक प्रमुखनेते आणि आमदारांनी रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती मंदिराला भेट दिली आहे. संघाच्या मुख्यालयात आलं कि देशभक्तीची प्रेरणा मिळते. इथं आल्याने नवी ऊर्जा मिळते अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

दरम्यान, यंदा कुठले ही औपचारिक बौद्धिक नसणार आहे. समाधीस्थाळाचे दर्शन आणि महर्षी व्यास सभागृहाच्या तळमजल्यावर अल्पहाराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्याच वेळेस संघ स्थानिक पदाधिकारी आणि वरिष्ठ स्वंयसेवकांसोबत चर्चा केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या: