Congress Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींशी संवाद साधणाऱ्यांची आयबी (IB) चौकशी करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दावा केला आहे की, तपास यंत्रणा आयबी यात्रेत सहभागी झालेल्यांकडून राहुल गांधींना दिलेल्या निवेदनाची प्रत मागवत आहे. याशिवाय काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
या यात्रेत काहीही गुपित नसल्याचं जयराम यांनी म्हटलं आहे. यासोबतच पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे नाव न घेता 'दोन लोक नाराज आहेत', असा टोला त्यांनी लगावला आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींशी संवाद साधणाऱ्या अशा अनेक लोकांची आयबी चौकशी करत असल्याचे त्यांनी ट्वीट त्यांनी केले आहे.
Congress Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो यात्रेत संशयित लोकही फिरत आहेत'
याशिवाय काँग्रेस नेते वैभव वालिया यांनी 23 डिसेंबर रोजी गुरुग्रामला जवळील सोहना येथे पोलिसांकडे तक्रार केली की, भारत जोडो यात्रेत काही लोक संशयास्पदरित्या फिरताना आणि कंटेनर तपासताना आढळले आहेत. त्यांनी ट्वीट केले की 23 डिसेंबरच्या सकाळी काही संशयित लोक आमच्या कंटेनरमध्ये घुसले आणि त्यातून बाहेर पडताना पकडले गेले. ''भारत जोडो यात्रेच्या वतीने मी सोहना शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रत देखील जोडली आहे. अनधिकृतपणे मला कळले आहे की, ते राज्य गुप्तचर अधिकारी होते.'', असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, तामिळनाडूतून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा नव्या वर्षात 3 जानेवारीला उत्तर प्रदेशात दाखल होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. ही यात्रा यूपीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसावी म्हणून काँग्रेसने खास तयार केली आहे. काँग्रेस अखिलेश यादव, मायावती, जयंत चौधरी यांनाही यूपीमधील भारत जोडो यात्रेत आमंत्रित करणार आहे. यासोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनीही ओमप्रकाश राजभर यांना निमंत्रण पाठवले आहे.