Kirit Somaiya On Navneet Rana: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. कारागृहातून सुटका होताच नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास जाणवत असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशातच त्यांची भेट घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या हे पोहोचले आहेत. राणा दाम्पत्यांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले आहेत की, नवनीत राणा आणि रवी राणा यांचा तुरुंगातला अनुभव ऐकला. त्यांचा अनुभव ऐकून मला इंग्रजांच्या काळाची आठवण झाली, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.    

रवी राणा मानसिकदृष्ट्या खचलेत: सोमय्या 

राणा दाम्पत्यांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या म्हणाले आहेत की, ''ज्या देशात राम मंदिर बनवलं जात आहे, त्याच देशात हनुमान चालीसा पठण करण्यावरून असे अत्याचार होत आहे. याचे मला खूप दुःख होत आहे.'' ते म्हणाले, ''नवनीत राणा यांचे संपूर्ण बॉडी चेकअप करण्याचे डॉक्टरांनी निर्देश दिले आहेत. आजपासून त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. त्याचे आणखी काही चेकअप केले जाणार आहेत. रवी राणा यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. मात्र ते मानसिकदृष्ट्या खूप खचले आहेत.''  

नवनीत राणा यांना किती दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार? 

सोमय्या पुढे म्हणाले की, नवनीत राणा यांनी आधीच आपल्याला स्पॉन्डॅलिसिसचा त्रास आहे, असं डॉक्टरांना सांगितलं होत. तरी त्यांना खाली बसणवण्यात आलं, सात तास रांगेत उभं केलं गेलं. यामुळे त्यांचा हा त्रास आणखी वाढला आहे. यासाठी त्यांची सायंकाळी पुन्हा डॉक्टर तपासणी करणार आहेत. यानंतर त्यांचे रिपोर्ट काढले जातील, त्यानंतर त्यांना किती दिवस रुग्णालयात राहावं लागणार आहे. हे डॉक्टर सांगतील, असं ते मानले.    

रवी राणा यांच्याबद्दल बोलताना सोमय्या म्हणाले आहेत की, जेव्हा ते तुरुंगातून सुटले, तेव्हा थेट येथेच (रुग्णालयात) आले. इथे पोहोचल्यानंतर पत्नीच्या चिंतेत त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. मी आजवर स्वप्नातही विचार केला नव्हता की, इंग्रजांच्या काळातील जेलर कसे अत्याचार करत असतील, ते आज प्रत्यक्ष रवी राणा यांना पाहून समजलं. त्यांना खूप धक्का बसला आहे, असं ते म्हणाले आहेत. 

संबंधित बातम्या: 

Navneet Rana : 12 दिवसांनंतर ते भेटले अन् अश्रूंचा बांध फुटला.., राणा दाम्पत्याची रुग्णालयातील भेट, व्हिडीओ होतोय व्हायरलRavi Rana : नवनीत राणांपाठोपाठ आता रवी राणांचीही 12 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका