Freedom March Rally: गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Mewani) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेश्मा पटेल (Reshma Patel) यांना मेहसाणा न्यायालयाने (Mehsana Court) तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपीला एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणी न्यायालयाने रेश्मा पटेल आणि मेवाणीसह 12 आरोपींना दोषी ठरवले आहे.
मेहसाणा न्यायालयाने 2017 च्या स्वातंत्र्य मार्च रॅलीच्या संदर्भात ही शिक्षा सुनावली. मेवाणी यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी परवानगी न घेताच स्वातंत्र्य मार्च रॅली काढली. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रेश्मा पटेल म्हणाल्या की, 'आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो, पण जनतेला न्याय मिळवून देणे हाही भाजपच्या राजवटीत गुन्हा आहे. कायद्याचा खोटा धाक दाखवून भाजप आमचा आवाज दाबू शकत नाही. जनतेच्या न्यायासाठी आम्ही सदैव लढत राहू.
काय म्हणालं न्यायालय?
हा आदेश पारित करताना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.ए.परमार म्हणाले की, रॅली काढणे हा गुन्हा नाही, परंतु परवानगीशिवाय रॅली काढणे हा गुन्हा आहे. न्यायालयाच्या आदेशाची अवज्ञा करणे कधीही खपवून घेतले जाणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
12 जुलै 2017 रोजी, जिग्नेश मेवाणी आणि तत्कालीन विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि इतरांनी हिमाचल प्रदेश येथील उना येथे चाबूक मारण्याच्या घटनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त 'स्वातंत्र्य मार्च' काढला. मेहसाणा जिल्हा प्रशासनाने मेवाणी यांना मोर्चा काढण्याची यापूर्वी दिलेली परवानगी रद्द केली होती. मेहसाणा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 143 नुसार बेकायदेशीर मोर्चा काढल्याबद्दल गुन्हा दाखल केला.
महत्त्वाच्या बातम्या: