Indapur : इंदापूर नगरपालिकामध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या वृत्ती विरोधात लढतो आहोत. त्यांची कार्यपद्धती आम्हाला मान्य नाही. महायुतीतील राष्ट्रवादी हा पक्ष द्वेषाने काम करतो, असा घनघात हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचा संघर्ष सर्वश्रुत आहे. इंदापूर नगर परिषदेमध्ये मी उमेदवार नसताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्यावर टीका केली. नेमकी आमची चूक की काय? असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी केला.

Continues below advertisement

इंदापूरनगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची सभा झाली. त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. याला आता हर्षवर्धन पाटील यांनी उत्तर दिलं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांवर जोरदार टीका करत त्यांचा निवडणुकीत पराभव होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Ajit Pawar : नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

Continues below advertisement

भरणे मामा साडेतीन वर्षे मंत्री आहे आणि ते 19 वर्षे मंत्री आहेत. मग तुमची नगरपरिषदेची, कोर्टाची प्रशासकीय भवन याची इमारत झाली का? कोणी केली का याचा विचार. लाथ मारेल तिथून पाणी काढेल, अशी ताकद लागते. नुसत नट्टापट्टा करून चालत नाही. कोणीतरी शिरसोडीच्या पुलावर देखील बोलला, की याचा काय फायदा, तुम्हा कळत असेल तर समजेल ना उगाच एखादा जाऊन त्यावरून आत्महत्या करणार असेल तर मी काय करणार? माझ्या मनात पण येत नाही. मला काहीजण म्हणाले इंदापुरात टाऊन हॉल करायचा आहे. 17 वर्षे झाले अद्याप तो पूर्ण झाला नाही, काय रे एकदाची चांगली जागा निवडा ना, पावसाची पाण्याची डबकी तिथे साठतात, काहीजण दमदाटी करत आहेत. अजिबात त्याला घाबरू नका, फक्त आपल्याकडून चुकू देऊ नका. गेले अनेक वर्षे आम्ही सकाळी सहाला उठून कामे करतोय. म्हणून बारामतीकर कसल्याही प्रकारच्या लाटा आल्या तरी माझ्या पाठीशी उभे राहतात. कारण माझं काम बोलतेय. असेही अजित पवार म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत पराभव

विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये होते. भाजपमध्ये असताना त्यांना देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्षपद दिले होते. परंतु इंदापूरची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जाणार हे नक्की झाल्यावर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. इंदापूर विधानसभेची निवडणूक तिरंगी झाली आणि त्याचा फटका हर्षवर्धन पाटलांना बसला. त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे निवडून आले.

मार्च महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदारपूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील कुलदैवत असणाऱ्या श्री लक्ष्मी नरसिंहाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागताला हर्षवर्धन पाटलांनी उपस्थिती लावल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. 

ही बातमी वाचा: