मालवण: राज्यात पार पडत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र दिसून आलं. सर्वात जास्त मालवण नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राज्याच्या सत्तेत एकत्रित असलेल्या महायुतीतील मित्रपक्षांनी एकमेंकावर आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केला, तर एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली, या दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यावरती मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी शिंदे गटाच्या धोरणांवर सडकून टीका करत मालवणच्या जनतेला विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मालवण दौऱ्यावर आल्यानंतर पैशांच्या बॅगा घेऊन आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.(Vaibhav Naik)
शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत दावा केला आहे. त्यासोबतच त्यांनी या व्हिडीओबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालवण दौऱ्यावर पैशांच्या बॅगा घेऊन आले होते, असा दावा वैभव नाईक यांनी केला आहे.
Eknath Shinde cash bag: वैभव नाईक यांची पोस्ट काय?
🛑 एकनाथ शिंदेंनी मालवणात आणल्या पैशांच्या बॅगा: व्हिडीओ वायरल🛑 भाजपवर आरोप करणाऱ्या निलेश राणेंकडूनही मालवणात पैशांचे वाटप🛑 माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोपएकीकडे निलेश राणेंनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले परंतु निलेश राणे आणि शिंदे- शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही. परवा एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशाच्या बॅगा घेऊन कॅमेरा पासून लपण्यासाठी धावत आहेत हे वरील व्हिडीओत स्पष्ट दिसून येत आहे. हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवण मधील मतदारांना वाटले आहेत. राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळविलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे- शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबविले जात आहे. असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेने विचार पूर्वक मतदान करावे असे आवाहन वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केले आहे.
Nilesh Rane Raid: निलेश राणे यांची भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड
दरम्यान निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपने पैसे वाटल्याचा आरोप करत भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली होती. तसेच निलेश राणे भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतलेला. त्यानंतर एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून २५ लाखांची रोकड जप्त केल्याचा दावा केला होता. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट आरोप केले होते, त्यानंतर आता वैभव नाईक यांनी निलेश राणेंवरतीही आरोप केले आहेत.