PM Modi Speech: गुजरातमधील दणदणीत विजयाचा जल्लोष दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपाध्यक्ष जे पी नड्डा हे देखील भाजपच्या मुख्यालयात उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi Latest Speech) म्हणाले की, मी गुजरात, हिमाचल आणि दिल्लीतील नागरिकांचे आभार व्यक्त करतो. गुजरात निवडणुकीच्या विजयाबद्दल बोलताना ते म्हणाले की, गुजरातने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. यावेळी नरेंद्रचा रेकॉर्ड तोडायला हवं, असं मी जनतेला सांगितलं होतं.


Pm Narendra Modi on Himachal Pradesh Election Result : हिमाचलमध्ये इतक्या कमी फरकाने निकाल कधीच आले नाहीत : पंतप्रधान मोदी


हिमाचल प्रदेशच्या निकालांवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, ''हिमाचलमध्ये इतक्या कमी फरकाने निकाल कधीच आले नाहीत. आमचा 1 टक्क्यांपेक्षा कमी मतांनी पराभव झाला. आम्ही हिमाचलशी संबंधित मुद्दे मांडत राहू.'' 


Pm Narendra Modi Latest Speech : जनतेचे विनम्र आभार : पंतप्रधान मोदी 


पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी जनतेसमोर नतमस्तक आहे. जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ आज आपल्याला मिळत आहे. जिथे भाजप जिंकू शकाल नाही, तिथे आपल्या मटणाची टक्केवारी वाढली आहे. मी गुजरात, हिमाचल आणि दिल्लीच्या लोकांचे नम्रपणे आभार व्यक्त करतो."


PM Modi Speech Live: गुजरातच्या जनतेने विक्रम मोडीत काढला आहेत : पंतप्रधान मोदी


पंतप्रधान मोदी म्हणाले, गुजरातच्या जनतेने विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम केला आहे. गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठा जनादेश भाजपला देऊन राज्यातील जनतेने नवा इतिहास रचला आहे. तरुण लोक तेव्हाच मतदान करतात जेव्हा त्यांना विश्वास असतो. त्यांना सरकारचे काम दिसले की, ते मतदान करतात. आज तरुणांनी मोठ्या संख्येने भाजपला मतदान केले आहे. तरुणांनी आमच्या कामाला तपासून, त्याची चाचपणी करून विश्वास दाखवला आहे. जात, वर्ग, समाज आणि सर्व प्रकारच्या भेदांच्या वर उठून भाजपला मतदान केले आहे. ते म्हणाले, गुजरातच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे की विकसित भारताची आकांक्षा सर्वसामान्यांमध्ये किती प्रबळ आहे. देशासमोर आव्हान असताना देशातील जनतेचा भाजपवर विश्वास आहे, हा संदेश स्पष्ट आहे.