मुंबई: भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पहिल्यांदाच थेट आणि गंभीर इशारा दिला आहे. "तुम्हाला राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा. अन्यथा धनगर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला आणि आंदोलनाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी", असा रोखठोक इशारा पडळकरांनी दिला. 


एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्त्वात ओबीसी नेते एकवटले आहेत. अशा परिस्थितीत गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना थेट टार्गेट केलं आहे. 


गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाल?


माननीय एकनाथ शिंदे साहेब आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. आपली ओळख संवेदनशील नेता अशी आहे. तरी, तुम्हाला राजधर्माची आठवण करुन देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात सर्वांसाठी सर्वसमावेशक नेतृत्त्व करणार असल्याची प्रतिज्ञा होती. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबाजवणीसाठी शासनाने 50 दिवस दिले होते. आज ही मुदत संपली आहे. 


तरी या मुद्द्यावर शाकीय पातळ्यांवर काहीही ठोस हलचाल दिसत नाही. फक्त  विशिष्ट समाजासाठी आपली वाट्टेल ते करायची तयारी आहे अशी धारणा बहुजन समाजाची आपल्याबद्दल होत आहे. आघाडी सरकारने आरक्षण नाकारुन धनगर जमातीवर अन्याय केला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महायुतीच्या सरकारचा नेतृत्त्वात धनगर आरक्षण अंमलबाजवणी होईल , ही आशा सामान्य धनगरांना आहे. मात्र, त्यांच्याकडूनही निराशा पदरी पडत आहे. धनगर समाजाच्या उद्धारासाठी सुरु असलेल्या योजना बंद आहेत. त्या आमच्या आठही मागण्यांची अंमलबाजवणीची तात्काळ गरज आहे. 


समित्या गठित करून धनगर समाजाच्या पदरात यातून काहीही पडणार नाही. ही भावना सामान्य धनगरांच्या मनात निर्माण होते आहे.आपण वेळीत योग्य पावलं उचलावीत. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा. 


अन्यथा धगनर समाजाच्या संविधानिक प्रतिक्रियेला आणि आंदोलनाच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. हा इशारा राज्यातील तमाम 5 कोटी धनगर समाजाच्यावतीने मी तुम्हाला देतो आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.


 जालन्यात ओबीसींचा महाएल्गार


दरम्यान, तिकडे जालन्यात आज ओबीसींच्या महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.  मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये, अशी प्रमुख मागणी ओबीसींची आहे. या आणि अन्य मागणीसाठी जालन्यातील अंबडमध्ये (Ambad Jalna) आज ओबीसी सभा (OBC Sabha) आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), महादेव जानकर (Mahadev Jankar), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), शिवाजीराव चोथे (Shivajirao Chothe) यासह ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge)  उपस्थितीत राहणार आहेत. 


Gopichand Padalkar on Eknath Shinde VIDEO : गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?



संबंधित बातम्या


Jalna OBC Sabha : जालन्यात ओबीसींचा महाएल्गार; 'या' आहेत प्रमुख मागण्या