Girish Mahajan on Kumbhmela: कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या संत आणि महतांविषयी कोणीही वाकडेतिकडे बोलल्यास सरकार ते खपवून घेणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिला. साधू आणि महंत गांजा (Ganja) पितात, त्यासाठी सरकार त्यांना पैसे देते, असे म्हणणे चूक आहे. जो कोणी असे बोलेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. साधू (Sadhu) आणि महतांविषयी कोणीही सोम्यागोम्या काहीही बोललेले आम्ही सहन करुन घेणार नाही. सोशल मिडीयावरुन साधू, महंतांविषयी जो कोणी अयोग्य वक्तव्य करेल, त्याच्यावरही कारवाई केली जाईल. मी याबाबत पोलीस आयुक्तांशी बोललो आहे, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. ते मंगळवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Nashik news)

Continues below advertisement

Nashik news: गिरीश महाजनांचा पाठिंबा मिळताच संत समितीचा आत्मविश्वास वाढला, त्र्यंबकेश्वर, तपोवन परिसरात मांसविक्री बंद करण्याची मागणी

गिरीश महाजन यांनी साधू-महंतांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचा संदेश दिल्यानंतर नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला. त्यांनी राज्य सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. तपोवन क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे. त्र्यंबकेश्वर आणि तपोवन परिसरात मांस आणि मद्य विक्री पूर्णतः बंद करण्याची मागणी अखिल भारतीय संत समितीने केली. झाडांच्या आडून विरोध करणाऱ्या लोकांचीही चौकशी करावी. तपोवनातील झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्यांना विदेशी फंडिंग होत असल्याचा आरोपही अखिल भारतीय संत समितीच्या  स्वामी जितेंद्रनन्द सरस्वती यांनी केला.

Continues below advertisement

Nashik Mahangarpalika Election: नाशिकमध्ये महायुतीचे एकत्र लढण्याचे धोरण: गिरीश महाजन

नाशिक महानगरपालिकेत युती म्हणून एकत्र लढण्याचे आमचे धोरण आहे. गेल्या निवडणुकीत आमच्या 67 जागा होत्या. आता पुढील निर्णय दोन-तीन दिवसांत घेऊ. नाशिकमध्ये तीन आमदार आमचे आहेत. त्यामुळे तिकीट मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांना इतर जबाबदारी देऊ. मोठ्या भावाची भूमिका आमची आहे. आमच्या 67 जागा आहेत, इतर पक्षातून आलेले असे पकडून 100 सिटिंग जागा आमच्या आहेत.  त्यामुळे शिवसेनेचे काय म्हणणे आहे ते ऐकून आम्ही निर्णय घेऊ, असे गिरीश महाजन यांनी म्हटले. 

शिंदेंच्या शिवसेना सोबत आमची युती व्हावी ही आमची भूमिका आहे. अजित पवार यांचे कमी लोक आहेत, त्याबाबत त्यांच्याशी बोलू. लोक महायुती सोबत आहेत, आम्ही महायुतीने निवडून येऊ. विरोधी पक्ष कुठे राहणार नाहीत, ही लोकांची मानसिकता आहे. काही जणांना मराठी माणसाचा आता कळवळा आलाय. लोकांना माहिती आहे, लोक दुधखुळे नाहीत. मुंबई महानगरपालिकेचा निकाल आश्चर्यकारक लागेल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा

माझे कार्टून बनवले, मला लाकूडतोड्या म्हटले; तपोवन वृक्षतोडीच्या वादावर गिरीश महाजन सगळंच बोलले; म्हणाले, आता तुम्ही सांगाल तेवढे...