Nagpur BJP Interviews : राज्यात महानगरपालिकेची निवडणूक जाहीर ( Election Date 2026) झाली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर होताच इच्छुकांकडून एकच धावपळ आणि मोर्चेबांधणी होत असल्याचे बघायला मिळाले आहे. अशातच नागपुरात भाजपकडे इच्छुकांचा महापूर लोटल्याचे चित्र आहे. एका जागेसाठी 10 इच्छुक असल्याची माहिती आहे. यावेळी मित्रपक्षांशी महायुती करू, मात्र मित्र पक्षांनी आपली शक्ती आणि क्षमता पाहूनच जागा मागाव्या, अशी भूमिका भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी (Dayashankar Tiwari) यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

Continues below advertisement

Nagpur BJP : महापालिकेतील 151 जागांसाठी भाजपकडे 1489 इच्छुकांचा अर्ज

नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून मुलाखतींना सुरुवात केली आहे. नागपूरच्या गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहे. महापालिकेतील 151 जागांसाठी भाजपकडे 1489 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे प्रत्येक जागेसाठी भाजपमध्ये किमान 10 इच्छुक उमेदवार दिसून येत आहे. प्रत्येक इच्छुकाला भाजपच्या 19 सदस्यीय मुलाखत मंडळच्या तीव्र प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.

Continues below advertisement

Dayashankar Tiwari : आपली क्षमता आणि शक्ती पाहूनच जागांची मागणी करावी

विशेष म्हणजे भाजपच्या दिग्गजांनी आधीच महायुती करण्याची इच्छा जाहीर केल्यामुळे नागपुरातील अनेक प्रभागात मित्र पक्षासाठी जागा सोडण्याची वेळ भाजपच्या स्थानिक नेते आणि इच्छुकांवर येऊ शकते. मात्र मित्र पक्षांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे आणि मागील निवडणुकीतील त्यांच्या जागा प्रमाणेच जागा मागाव्यात, असं सूचक वक्तव्य भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केलं आहे. आमचे मित्र पक्ष असलेल्या एकसंघ शिवसेनेचे मागील वेळेला फक्त 2 नगरसेवक होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त 1 नगरसेवक होता. त्यामुळे यंदाही दोन्ही पक्षांनी आपली क्षमता आणि शक्ती पाहूनच जागांची मागणी करावी असेही तिवारी म्हणाले.

भाजप इच्छुकांना विचारले जाणारे प्रश्न कोणते?

- प्रभागा संदर्भातली सर्वसाधारण माहिती

-प्रभागातील राजकीय आणि सामाजिक समीकरण काय आहेत?

- प्रभागातील समस्या काय आहेत?

-जर उमेदवारी मिळाली नाही तर पक्षाने निवडलेल्या उमेदवारासाठी काम करणार की नाही?

-जर संबंधित जागा मित्र पक्षाला गेली तर मित्र पक्षासाठी काम करणार की नाही?

संबंधित बातमी: