Girish Mahajan on Loksabha Election, Jalgaon : "घोडामैदान समोर आहे. जळगाव लोकसभेच्या जागेबाबतच्या बातम्या, निराधार गोष्टी आहेत. त्यामुळे आपण चार तारखेला भेटू. जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभांमध्ये आमच्या उमेदवाराला सर्वात उच्चांकी आणि विक्रमी मत मिळतील. लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सहाच्या सहा जागा विजय होतील. महायुतीच्या सर्वात जास्त जागा महाराष्ट्रातून निवडून येतील", असा दावा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत, आम्हाला देशात स्पष्ट बहुमत मिळेल
गिरीश महाजन म्हणाले, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. आम्हाला देशात स्पष्ट बहुमत मिळेल. मोठ्या मतांनी आमचे खासदार देशात निवडून येतील व पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. देशवासीयांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं ठरवला आहे, त्यानुसार तेच पंतप्रधान होतील, असंही गिरीश महाजनांनी म्हटलं आहे. संजय राऊतांच्या नितीन गडकरींबाबतच्या दाव्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, संजय राऊत यांचे डोकं तपासावा लागेल. आता तेवढेच राहिला आहे. 4 जूनला निकाल लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयातच दाखल करावा लागेल.
जिल्हाधिकाऱ्यांनी उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आदेश काढलेले आहेत
पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आदेश काढलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा आवश्यक काम नसताना बाहेर पडू नये. जिल्ह्यात बेवारस लोकांचे मृर्तदेह आढळले आहेत. त्यात काही लोकांचा सुद्धा उष्माघातामुळेच मृत्यू झालेला असेल. कारण 47 पर्यंत तापमान पोहोचलेला आहे. त्याचा निश्चितच परिणाम हा होत आहे.
ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी मी रात्रभर जिल्हा रुग्णालयात होतो
रामदेववाडी अपघात प्रकरणी मयत कुटुंबीयांच्या आरोपावर बोलताना महाजन म्हणाले, ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी मी रात्रभर जिल्हा रुग्णालयात होतो. माझे सर्व आमदार पदाधिकारी कार्यकर्ते हे रुग्णालयात होते. सकाळी मंत्री गुलाबराव पाटील हे सुद्धा होते. त्यामुळे मंत्र्यांनी दखल घेतली नाही. असा विषय नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी बोललो. आम्ही मयत कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी पाच पाच लाख रुपयांचा धनादेश देत आहोत. या प्रकरणात कोणाचाही राजकीय दबाव नाही. या जो कोणी असेल त्याच्यावर निश्चितच कायदेशीर कारवाई केली जाईल. कुणाचीही हयगय केली जाणार नाही. आरोपीच्या रक्ताचे नमुने हे घेण्यात आलेले आहेत. बाहेरगावी पाठवले असतील त्यामुळे त्याला थोडा वेळ लागत असेल, असंही गिरीश महाजन यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Ajit Pawar on Sharad Pawar : ...तरच शरद पवारांशी जुळवून घेऊ, निकालापूर्वी अजित पवार यांचं मोठं वक्तव्य !
-