Girish Mahajan, जळगाव : गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्याला काय करायचे हे माहित आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच  सरकार  मोठ्या मताधिक्याने येणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. दिलीप खोडपे यांच्या बाबत विचारले असता मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त करत बोलण्यास नकार दिला. ते जळगावमध्ये एबीपी माझाशी बोलत होते. 


घोडा मैदान समोर आहे, निवडणूक संपल्यावर माझ्याशी बोला


गिरीश महाजन म्हणाले, गेल्या सहा-सात टर्मपासून आपल्या विरोधात अनेक जण लढा देऊन थकले. आता कोणालाही येऊ द्या,आणि गंमत बघा ,घोडा मैदान समोर आहे. निवडणूक संपल्यावर माझ्याशी बोला, अशा प्रकारची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.


जनतेला सुखी ठेव दुष्काळ पडू देऊ नको


यंदा गणेश उत्सव साठी नागरिकांच्या मधे मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. जनतेला सुखी ठेव दुष्काळ पडू देऊ नको अशी मागणी आपण बाप्पाच्या कडे केली असल्याचही मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. जळगाव शहरातील विविध गणेश मंडळांना गिरीश महाजन यांनी भेटी दिल्या.  ताशांच्या गजरात मंत्री गिरीश महाजन यांना कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहाचे खातर फेर धरण्याचा मोह  मात्र आवरता आला नाही. 


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपच्या मातब्बर नेत्याला गळाला लावलं आहे. भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. या यात्रेदरम्यान खोडपे यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिलीप खोडपे यांची जळगाव जिल्ह्यात मराठा नेता म्हणून ओळख आहे. एकट्या जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल 1 लाख 40 हजार मतदान आहे. त्यामुळे दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या समोर तगडे आव्हान देऊ शकतात. शरद पवारांच्या या खेळीची चर्चा आता संपूर्ण राज्यात होत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Supriya Sule and Rashmi Thackeray '...तर सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे मुख्यमंत्रि‍पदाच्या दावेदार असू शकतात', काँग्रेस खासदाराचं रोखठोक वक्तव्य