Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आसाममधील गुवाहाटी येथे भारतीय जनता पक्षाच्या राज्य मुख्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी अमित शहांनी काँग्रेस लक्ष केलं आहे. ते म्हणाले, ''आज मी गृहमंत्री म्हणून आसाममध्ये आलो नाही, भाजपचा कार्यकर्ता म्हणून आज आलो आहे.'' 


अमित शाह यांनी सांगितलं 'तो' किस्सा 


गुवाहाटीतील जाहीरसभेला संबोधित करताना अमित शाह यांनीही काँग्रेसवर हल्लाबोल केला. अमित शाह म्हणाले, 'काँग्रेसने आसामला आतंग्लंड बनवले होते. अमित शाह पुढे म्हणाले, 'मी येथे विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमासाठी आलो होतो, तेव्हा आम्हाला आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हितेश्वर सैकिया यांच्या आदेशावरून मारहाण करण्यात आली होती. अमित शाह यांनी सांगितले की, तेव्हा आम्ही घोषणा दिल्या होत्या की..'असम की गलियां सूनी है, इंदिरा गांधी खूनी है.' शाह म्हणाले की, त्यावेळी आम्हाला कधीच वाटले नव्हेते की, आसाममध्ये सलग दोन वेळा भाजपचे सरकार स्थापन होईल. दरम्यान, काँग्रेस नेते हितेश्वर सैकिया यांचे 1996 मध्ये निधन झाले. ते दोनदा आसामचे मुख्यमंत्री झाले.  


यावेळी बोलताना अमित शाह  म्हणाले की आसामची मुख्य समस्या काँग्रेसमुळेच निर्माण झाली आहे. जी आसामची पवित्र आणि शांत भूमी फुटीर बनवण्यासाठी नेहमीच उत्सुक होती. माझ्या विद्यार्थी परिषदेच्या काळात आसाममध्ये आपण स्वबळावर सरकार स्थापन करू, असे कधीच वाटले नव्हते, परंतु आज राज्यात भाजपची सत्ता सर्वांगीण विकासाची हमी देत ​​आहे. मला आज खूप आनंद होत आहे की, 2014 ते 2022 या अल्पावधीत आज संपूर्ण ईशान्य आणि आपला आसाम विकासाच्या मार्गावर आहे.




भाजप कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अमित शाह म्हणाले की, माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे की ईशान्येचा विकास आणि ईशान्येतील भाजपचा विकास या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या आहेत. इतर पक्षांसाठी कार्यालय हे विटा आणि दगडांनी बनवलेले घर असेल. पण भाजप कार्यकर्त्यांसाठी ते मंदिर आहे. भाजपच्या कार्यकर्त्यासाठी कार्यालय ही इमारत नाही, कार्यालय म्हणजे भावनांचा गठ्ठा आहे. इथे कामाची रूपरेषा आखली जाते आणि इथेच संपूर्ण ईशान्य आणि आसामच्या विकासाच्या योजना भाजपने बनवल्या आहेत.