Sanjay Raut Samna: 'हवा गरम आहे. मामला थंड होईपर्यंत आराम करा. नंतर पुन्हा मंत्रिमंडळात याल असे पाहू' असे फडणवीस मुंडे व अजित पवारांमध्ये ठरले आणि त्यानंतर हा राजीनामा झाला .नैतिक श्रेय फडणवीस किंवा अजित पवारांनी घ्यायचे कारण नाही .अशी टीका ही राऊतांनी सामना अग्रलेखातून केलीय .  धनंजय मुंडेंचा राजीनामा एक नाटक असल्याचं सांगत ही केवळ धूळफेक आणि ऍडजस्टमेंट असल्याचं संजय राऊत म्हणाले . धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे श्रेय विरोधकांना मिळू नये म्हणून सरकारने पुन्हा त्या क्रूर औरंग्याचा वापर केला व त्यासाठी भाजपच्या लाडक्या अबू आझमींना औरंग्यावर वक्तव्य करण्याची सुपारी दिली असल्याची टीकाही राऊतांनी केली. (Sanjay Raut)


राज्यात मंगळवारचा दिवस प्रचंड वादळी ठरल्याचं दिसलं.एकीकडे संतोष देशमुख यांना पाशवी मारहाण करताना आरोपींनी किती क्रूर पद्धतीने मारहाण केली याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने संपूर्ण राज्य हादरले. दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा दिला. तर महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात  अबु आझमींच्या  (Abu Azmi) औरंगजेबाच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा गोंधळ झाला. या प्रकरणावरून सामनाचे संपादक संजय राऊत यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा एक नाटक असल्याचं संजय राऊतांनी धनंजय मुंडेंसह सरकारवर सडकून टीका केली . (DHananjay Munde)


अबु आझमींना औरंग्यावर वक्तव्य करण्याची सुपारी दिली: संजय राऊत


धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे श्रेय विरोधकांना मिळू नये म्हणून सरकारने पुन्हा त्या क्रूर औरंग्याचा वापर केला व त्यासाठी भाजपच्या लाडक्या अबू आझमींना औरंग्यावर वक्तव्य करण्याची सुपारी दिली असल्याचा आरोप संजय राऊतांनी सामना अग्रलेखातून केला. आझमी यांनी औरंग्यावर विधान करताच भाजपने गोंधळ सुरू केला. मुंडे यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्षाने आवाज वाढवताच सत्ताधारी बाकावरून आझमींच्या औरंगजेबावरील विधानावरून घमासान सुरू झाले. त्या गोंधळात विधानसभा संपली. राष्ट्रीय पातळीवर ओवेसी व राज्यात आझमींसारखे लोक हे भाजपचे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसडर’ आहेत. भाजपच्या नैतिकतेचा फुगा मुंडे आणि आझमी प्रकरणात फुटला. आझमी यांनी गायलेले ‘औरंगजेब स्तवन’ हे सरळ सरळ सरकार पुरस्कृत होते. लोकांना मूर्ख समजलात काय? असा सवालही राऊतांनी केला.


काय म्हणाले संजय राऊत?


धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. हे एक नाटक आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मुंडे यांनी पोसलेल्या गुंडांनी अत्यंत क्रूरपणे म्हणजे औरंगजेबी पद्धतीने मारले. या खुनाची नैतिक जबाबदारी घेऊन मुंडे यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता. खरे तर मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीच व्हायला हवी होती, पण मुंडे यांचे जे राजीनामापत्र प्रसिद्ध झाले, त्यानुसार या महाशयांनी देशमुख खून प्रकरणात नव्हे, तर वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला. मुंडे यांची राजीनामापत्रातील भाषा म्हणजे ‘नैतिकता’ या शब्दाची क्रूर थट्टाच म्हणावी लागेल. असेही राऊत म्हणाले.


मुंडे यांनी सांगितले की त्यांना बेल्स पालसी नामक गंभीर व विचित्र आजार झालाय .त्यामुळे दोन मिनिटेही त्यांना नीट बोलता येत नाही .राजीनाम्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पहिल्या तर ते चांगलेच चुरुचुरू बोलत आहेत .यावर विश्वास कसा ठेवायचा ? ‘‘हवा गरम आहे. मामला थंड होईपर्यंत आराम करा. नंतर पुन्हा मंत्रिमंडळात याल असे पाहू,’’ असे फडणवीस, मुंडे व अजित पवारांत ठरले आणि त्यानंतर हा राजीनामा झाला. राजीनाम्याचे नैतिक श्रेय फडणवीस किंवा अजित पवारांनी घ्यायचे कारण नाही. अशी कडवी टीकाही राऊतांनी केली.


 



हेही वाचा:


Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांचा विरोधी पक्षनेता होण्याचा मार्ग कठीणच? भाजप-शिवसेनेचा विरोध, नेमकं काय कारण?