Eknath Shinde VS BJP : ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ली मात्र, आता भाजपने ठाण्यात वर्चस्व मिळवण्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केलीये. भाजपने वनमंत्री असलेल्या गणेश नाईकांना ठाण्यात जनता दरबार घेण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी फ्री हँड दिलाय. त्यात नाईकही बोलण्यात मागे राहिलेले नाहीत. त्यांनी थेट ठाण्यात येत्या निवडणुकीत 'ओन्ली कमळ' फुलवायचे, असं म्हणत रणशिंग फुंकलय. त्यामुळे भाजपने शिंदेंच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत का? असा प्रश्न निर्माण झालाय. 


राज्याच्या वनखात्याची आणि पालकमंत्री म्हणून पालघरची जबाबदारी यांच्या खांद्यावर आहे..पण गणेश नाईकांना जास्त इंट्रेस्ट आहे तो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाण्यात...ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला...मात्र ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या क्षमतेवर गणेश नाईकांचा विश्वास नाहीय का? आणि जर असेल तर मग गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार का घेणार आहेत...?


आता एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याचा निर्णय गणेश नाईकांनी परस्पर तर घेतला नसेलच...भाजपश्रेष्ठींच्या आदेशानंतरच त्यांनी ठाण्याच्या सहपालकत्वाची जबाबदारी खांद्यावर घेतलेली दिसतेय. कोणत्याही मंत्र्याला राज्यात कुठेही जनता दरबार घेण्याचं परमिट बावनकुळेंनी दिलं असलं...
तरी गणेश नाईकांच्या पोटातलं ओठावर आलंच


आता कॅप्टनच्या होमपिचवर मित्र संघातलाच खेळाडू कॅप्टन होऊ पाहतोय म्हटल्यावर, शिंदेंच्या टीममधले खेळाडू शांत कसे बसतील...शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी ईट का जवाब पत्थरसे स्टाईलनं, गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये जनता दरबार भरवण्याचा इशारा दिलाय.


या सगळ्या प्रकरणात मोस्ट अवेटेड प्रतिक्रिया होती की एकनाथ शिंदेंची... तूर्तास तरी त्यांनी, कोणत्याही मंत्र्यांना कोणत्याही जिल्ह्यात जनता दरबार भरवण्यास हरकत नसल्याचं म्हटलंय...सरकार स्थापन होण्यापूर्वी एकनाथ शिंदेंची असलेली नाराजी, सरकारला दोन महिने झाले तरी कायम आहे..मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील एकनाथ शिंदेंनी ऑनलाईन उपस्थिती लावली..


रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही कायम आहे...उलट त्यावरून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातली दरी वाढत चाललीय..पालकमंत्रिपदाचा फैसला मुख्यमंत्री घेणार आहेत..देवेंद्र फडणवीस दावोसहून परतल्यानंतरही अजून काही ठोस निर्णय झालेला नाही..


नाराजी व्यक्त करण्यासाठी दरेगाव टूरचा पॅटर्न देखील जुना होत चाललाय..आणि आता तर भाजपच्या गणेश नाईकांनी शिंदेंच्या ठाण्यात हाय पाय पसरायला सुरुवात केलीय..आता या राजकीय घुसखोरीचा शिंदे कसा  सामना करणार?


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Ulhasnagar : जन्मजात बाळाची 90 हजारांना विक्री, उल्हासनगरात आई-वडिलांचंच कृत्य, परिस्थितीचे कारण सांगितलं