मुंबई : विरोधकांकडे झेंडा पण नाही आणि अजेंडा पण नाही, रंग बदलणारे सरडे पाहिले, मात्र एवढा लवकर रंग बदलणारा सरडा कुणी पहिला का? असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करून एकजुटीने महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांना निवडून आणण्याचे आवाहन केलं आहे. 

कपिल पाटील तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

एकनाथ शिंदे म्हणाले, दोन टप्प्यात महायुती सगळ्यात पुढे आहे. अर्ज भरण्याची रॅली ही विजयी रॅली होती. देशभरात भगवं वादळ पाहायला मिळत आहे. अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार. मनसे,राष्ट्रवादी, जमशक्ती आरपीआय आली, सर्व आले. कपिल पाटील तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला आहे. 

ही देशाची निवडणूक

सगळ्यांना आपआपल्या परीने काम करून द्या. सर्वांना ताकद द्या. आपले आमदार आहेत , नगरसेवक , महापौर आहेत, सर्वांना ताकद द्या. खासदार आणि मंत्री असलात तरी कार्यकर्त्यांना मदत द्या, कार्यकर्त्यांना सांभाळा. ही निवडणूक देशाची आहे. मोदी सरकारने रस्ते, एयरपोर्ट, रेल्वे अशी विकासाची कामे केली आहेत. महायुती मजबूत आहे, असं एकनाश शिंदे म्हणाले. 

शिवसेना आणि काँग्रेसवर जहरी टीका

फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येत नाही, घरात बसून राज्य चालवता येत नाही. जे काँग्रेसला जमलं नाही, ते 10 वर्षात मोदींनी केलं. महिला सक्षमीकरण केलं. युवा , जैष्टांना सुविधा, रोजगार देण्याचं काम सरकार करतंय. भारत बोलतो, जग ऐकतो, असं काम मोदींनी केलं आहे. विरोधकांकडे झेंडा पण नाही आणि अजेंडा पण नाही, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर टीका केली आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेला पटत नाही

संविधान बदलणार नाही. बाबासाहेबांच्या संविधानावर देशाचा कारभार चालतोय. संविधान दिन 2015 पासून साजरा करायला मोदींनी सुरुवात केलं. इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं भव्य स्मारक बांधण्याचं काम आपलं सरकार करत आहे. यापूर्वी देशात घोटाळे ऐकायला मिळत होते, आता विकासाची कामे ऐकायला मिळत आहे. गरीबी हटविण्याचे काम मोदींनी केले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेला पटत नाही, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

इंडिया आघाडीचे लोक शहीदांचा अपमान करतात

रंग बदलणारे सरडे पाहिले, मात्र एवढा लवकर रंग बदलणारा सरडा कुणी पहिला का? असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची व्हिडीओ क्लिप ऐकवली. इंडिया आघाडीचे लोक शहीदांचा अपमान करतात. करकरेंना कसाबची गोळी लागले, पण हे लोक पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत. काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ,असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मोठी बातमी : विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार, शहीद हेमंत करकरे प्रकरणी आक्रमक