Thane Loksabha : ठाणे लोकसभा (Thane Loksabha) क्षेत्रात महायुतीकडून अखेर शिवसेनेचे नरेश मस्के (Naresh Mhaske) यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र त्यानंतर नवी मुंबई (Mumbai) येथील भाजपाचे नेते गणेश नाईक आणि त्यांचे सूपुत्र संजीव नाईक यांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे नाराजी नाट्य पाहिला मिळाले होते. दरम्यान नरेश मस्के त्यांना भेटायला गेले असतात त्यांची भेट झाली नव्हती. अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. मात्र नरेश मस्के यांनी अर्ज भरतानाच गणेश नाईक यावेळी उपस्थित असल्याने या नाराजी नाट्यावर पडदा पडला होता.


नरेश म्हस्के यांनी गणेशजी नाईक यांचे आशीर्वाद घेतले


आता पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांनी आज  माजी मंत्री व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेशजी नाईक यांची नरेश म्हस्के यांनी सदिच्छा भेट घेतली. निवडणुकीतील विजयासाठी नरेश म्हस्के यांनी गणेशजी नाईक यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी माजी खासदार डॉ.संजीवजी नाईक, माजी आमदार संदीपजी नाईक, माजी महापौर सागरजी उपस्थित होते. 


 गणेश नाईक आपल्याबरोबरच आहेत


तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी नरेश म्हस्के आणि गणेशजी नाईक यांच्यात चर्चा झाली. प्रचारसभा, चौक सभा, जाहीर सभेबरोबरच घरोघर जाऊन मतदारांपर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचे निर्णय पोहोचवले पाहिजेत. अबकी बार ४०० पार खासदार निवडून यायलाच हवेत अशी भूमिका उपस्थित सर्वांनी व्यक्त केली. गणेश नाईक आपल्याबरोबरच आहेत, असा जणू एक संकेतच दिलेला पाहिला मिळाला. तसेच विजयासाठी नरेश म्हस्के आशीर्वाद दिले आहेत. 


ठाण्यात राजन विचारे वि. नरेश म्हस्के 


ठाणे लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. दरम्यान, निवडणूक जवळ येताच एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आनंद दिघे यांचं निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्याबद्दल विचारपूस न करता, त्यांची संपत्ती कुठे आहे? याबाबत चौकशी केली होती, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आनंद दिघेंचे निधन झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेकडून अनेक पदं उपभोगली आहेत, ते खोटं बोलतात, असं ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


काँग्रेस कसाबची बाजू घेतंय, हा शहीदांचा अपमान; पंतप्रधान मोदींचा वडेट्टीवारांवर जोरदार हल्लाबोल