Nagpur News नागपूर : देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) आणि त्यांच्या निकालानंतर संघ नेतृत्वाची जाहीर भूमिका काल पहिल्यांदाच सर्वांसमोर आली. संघाच्या प्रशिक्षण प्रणालीत अत्यंत महत्वाच्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपीय सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी फक्त काँग्रेस किंवा इंडी आघाडीच्या पक्षांनाच धारेवर धरले नाही, तर भाजप आणि पंतप्रधान मोदी  (PM Narendra Modi) यांना ही जोरदार कानपिचक्या दिल्या आहेत. त्यामुळे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकादरम्यान सर्वच पक्षांकडून झालेला कडवा प्रचार आणि त्यानंतर आलेल्या निकालाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज आहे का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित होऊ लागला आहे.


सरसंघचालकांची काँग्रेसच्या खोट्या प्रचारावर नाराजी


निवडणूक लढवताना एक मर्यादा पाळायची असते. मात्र, यंदा देशातील निवडणुकीत त्या मर्यादेचा पालन झालं नाही, अशी उघड खंत सरसंघचालकांनी बोलून दाखविली. निवडणुकीच्या प्रचारामध्ये ज्या पद्धतीने वक्तव्ये करण्यात आली. त्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होईल याचा विचार ही करण्यात आला नाही. शिवाय त्यामध्ये आम्हालाही (संघासारख्या संघटनेला) नाहक ओढण्यात आले. टेक्नॉलॉजीचा वापर करून असत्य मांडण्याचा प्रयत्न झाला. निवडणुकीत दोन पक्षांमध्ये स्पर्धा असते, एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न असतो, मात्र त्यासाठी असत्याचा वापर करण्यात येऊ नये. अशाने देश कसा चालेल? असे प्रश्न उपस्थित करत सरसंघचालकांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी ते नागपूर येथे बोलत होते.


संघ पंतप्रधान मोदी आणि भाजप नेतृत्वावर नाराज आहे का?


पुढे बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका संताने सांगितलेल्या कबीरच्या काही काव्याचा उदाहरण देत भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की,  सेवक कसा असावा, सेवा करणाऱ्यांमध्ये अहंकार नको, मी पणा नको, सरसंघचालकांचे हे वक्तव्य नाव न घेता भाजप नेतृत्वासाठी होते का, असेही अनेकांना आता वाटत आहे.    


मोहन भागवत शब्दशः काय म्हणाले 


"निर्बंधा बंधा रहे, बंधा निर्बंधा होय, कर्म करे कर्ता नहीं, दास कहाए सोए" जो सेवा करता है, जो वास्तविक सेवक है, जिसे वास्तविक सेवक कहा जा सकता है, उसे मर्यादा से चलना होता है..  काम तो सभी करते हैं, लेकिन काम करते वक्त मर्यादा का पालन करना भी जरूरी है...कार्य करते समय दूसरों को धक्का नहीं लगना चाहिए, यह मर्यादा भी उसमें निहित है।। इस मर्यादा का पालन करके हम काम करते हैं।। काम करने वाला उस मर्यादा का ध्यान रखना है और वही मर्यादा हमारा धर्म और हमारी संस्कृति है।।  उस मर्यादा का पालन करके जो चलता है, वह कर्म करता है, वह कर्मों में लिप्त नहीं होता, उसमें अहंकार नहीं आता कि यह मैंने किया है.. और जो ऐसा करता है वही सेवक कहलाने का अधिकारी होता है.  


मणिपूरच्या स्थितीबद्दल संघाची नाराजी उघड


देशाच्या ईशान्यकडील राज्यात मोठा काम करणारं संघ मणिपूरच्या स्थितीवरून ही समाधानी नाही, हे कालच्या भागवतांच्या वक्तव्यावरून स्पष्ट जाणवले. एका वर्षांपासून मणिपूर शांततेची वाट पाहत आहे. त्यापूर्वी दहा वर्ष मणिपूर शांत होतं. मात्र, अचानक तिथे अशांतता निर्माण झाली किंवा निर्माण करण्यात आली. त्या आगीत मणिपूर आज ही जळत असून लोकं त्राही त्राही करत आहे, त्याकडे कोण लक्ष घालणार, असा सवाल सरसंघचालक यांनी विचारला. ते एवढ्यावरच थांबले नाही तर पुढे मणिपूरकडे प्राधान्याने लक्ष घालणे आवश्यक असल्याची  सूचना ही केंद्र सरकारला केलीय. 


दरम्यान, लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपची जी पीछेहाट झाली, त्यामागे दलित आणि मुस्लिम मते पूर्णपणे काँग्रेस आणि इंडी आघाडीकडे जाणे हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. त्याबद्दल ही सरसंघचालकांनी थेट नाही मात्र अप्रत्यक्ष वक्तव्य केलेय. धर्म ग्रंथात कोणताही आधार नसताना, शेकडो वर्ष पाळण्यात आलेल्या अस्पृश्यतेमुळे समाजातील काही घटक त्याकाळी झालेल्या अन्यायाबाबत वर्तमानकाळात ही नाराज आहे. तेव्हा झालेल्या अन्यायाबद्दल जी नाराजी आहे, त्यामुळेच आपलेच काही लोक रुसलेले आहेत. त्यासाठी आपापसात रोटी, बेटी व्यवहार करणे, एकमेकांना भेटणे, एकमेकात मिसळणे हे सर्व होणे आवश्यक असल्याचे मत सरसंघचालकानी व्यक्त केलंय.


संघाच्या अजेंडयावरील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाजपने ठोस काम करत ती कामे मार्गी लावली आहे. तर अनेक मुद्यांसंदर्भात अजूनही निर्णय होणे बाकी आहे. अशा स्थितीत एक प्रचारक पंतप्रधान पदावर असण्याचा काय महत्त्व असते, हे संघ नेतृत्वाला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे सध्या उफाळून आलेली संघ नेतृत्वाची भाजप नेतृत्व सदर्भातली नाराजी अल्पकालीकच ठरण्याची जास्त शक्यता असल्याचे बोलले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या