सातारा : नाशिकमधील शिवसेना युबीटी (Shivsena) पक्षाच्या निर्धार मेळव्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर आणि नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. या कार्यक्रमात AI च्या माध्यमातून स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज काढत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यावर आज एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्व नाही तर लाज सोडली, सगळं करुन मी त्या गावचा नाही असं म्हणणारी ही वृत्ती असते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath shinde) नाव न घेता उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. काल त्यांनी कळस केला, AI च्या माध्यमातून आवाज काढून तुम्हाला बाळासाहेबांचे मत बदलता येणार नाही, असेही शिंदेंनी म्हटले.

Continues below advertisement


बाळासाहेब ठाकरे यांचे काही व्हिडिओ मोबाईलवर दाखवत एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांचे एकनाथ शिंदेंबाबतचे विचार काय होते, ते दाखवले. तसेच काँग्रेससोबत मी कधीच जाणार नाही, तशी वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन, असं बाळासाहेबांनी बोलल्याचाही व्हिडिओ एकनाथ शिंदेंनी दाखवला.  एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्व नाही तर लाज सोडली, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. A I चा आवाज काढून तुम्हाला बाळासाहेबांचे मत बदलता येणार नाही. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून तर तुमची सत्ता गेली. राज ठाकरे, छगन भुजबळ यांच्यासह कित्येक जणांनी तुम्हाला सोडलं, आजही लोकं तुम्हाला सोडून जात आहेत. कारण, स्वार्थी आणि नकली टोळीसोबत कोणी राहणार नाही. तुम्ही घाण टाकली होती, आम्ही शिवसेना पुढे घेऊन आलो आहोत, असेही शिंदेनी म्हटले.


एकनाथ शिंदेंनी दरेगावी फुलवली सफरचंदाची बाग


सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी आले आहेत, त्यांनी गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाड लागवड सुरू केली आहे. दुर्गम भागामध्ये सफरचंद, आंबा, चिकू, फणस यांसारखे अनेक वेगवेगळ्या प्रजातींच्या झाडांची लागवड या ठिकाणी केली आहे. त्याचबरोबर युवकांना देखील नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योग धंदे गावामध्ये मिळणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.


हेही वाचा


इनोव्हाने दुचाकीस 200 मीटर फरफटत नेले, पती-पत्नीचा मृत्यू; संतप्त जमावाने कार फोडली