President Droupadi Murmu: देशाच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी आज राष्ट्रपती म्हणून गोपनीयतेची शपथ घेतली आहे. देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती मुर्मू यांचं खरं नाव हे द्रौपदी नाही, अशी माहिती त्यांनीच एका मुलाखतीदरम्यान दिली आहे. आपल्या नावामागची गोष्ट सांगताना ओडिया व्हिडीओ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मुर्मू यांनी सांगितले की, त्यांचं खरं नाव हे 'पुती' असे होते. जे त्यांच्या शाळेतील शिक्षकाने बदलून द्रौपदी, असे ठेवले. त्यांच्या शिक्षकाने त्यांचं हे नाव  महाभारतील पात्रावरून ठेवले होते. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुर्मू यांनी मासिकाला सांगितले होते की, ''द्रौपदी हे माझे खरे नाव नाही. माझे नाव दुसर्‍या जिल्ह्यातील एका शिक्षकाने ठेवले होते. जे माझ्या मूळ जिल्ह्यातील मयूरभंजचे नव्हते.''  


द्रौपदी मुर्मू यांनी मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 1960 च्या दशकात आदिवासीबहुल मयूरभंज जिल्ह्यातील शिक्षक बालासोर किंवा कटकला येथे दौऱ्यावर जायचे. त्यांचे नाव द्रौपदी का ठेवण्यात आले असे विचारले असता त्या म्हणाल्या की, “शिक्षकांना माझे जुने नाव आवडले नाही, म्हणून त्यांनी ते बदलले. त्यांनी सांगितलं की त्यांचं नाव दुरपदी ते द्रौपदी पर्यंत अनेकवेळा बदलण्यात आले. 


मुर्मू यांनी सांगितलं की, संथाली संस्कृतीत आपल्या आजी-आजोबांचे नाव नाथ आणि नाथूला दिले जाते. जर मुलगी जन्माला आली तर तिला तिच्या आजीचे नाव दिले जाते आणि जेव्हा मुलगा जन्माला येतो तेव्हा तिचे नाव तिच्या आजोबांच्या नावावर ठेवले जाते." शाळेत-कॉलेजमध्ये असताना द्रौपदी यांचे टोपण आडनाव तुडू असे होते. शाम चरण या बँक अधिकाऱ्यांशी विवाह केल्यानंतर त्यांनी मुर्मू हे आडनाव स्वीकारलं. दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही.रामन यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली.


इतर महत्वाची बातमी: 


Law Linking Aadhaar Voter ID : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवालांच्या आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग कायद्याविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार 
Ex President Facilities : मोठं घर, लाखावर पेन्शन, सेवेला कर्मचारी आणि बरंच काही... निवृत्तीनंतर माजी राष्ट्रपतींना आयुष्यभर मिळतात या सुविधा